लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.तेजश्री जैन यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात......

Bay- team aavaj marathi 

Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)

उमरखेड येथे दि. १ जानेवारी रोजी नगर परिषदेच्या प्रांगणात लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. तेजश्री जैन यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी नगरपालिकेचा कार्यभार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी मागील आठ वर्षांपासून भ्रष्टाचाराची एक प्रकारे बिमारी लावून ठेवली होती. त्याचे किड मुळासकट उखडून टाकण्यात येणार येईल आत्तापर्यंत जे झाले ते झाले. आता जनशक्ती पॅनलची सत्ता असून, येत्या पाच वर्षांत भ्रष्टाचार मुक्त शहराचा विकास केल्या जाईल. तसेच शहराच्या विकास कामांमध्ये पारदर्शकता ठेवण्यात येईल असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर अग्रवाल यांनी केले. 
मनोगत व्यक्त करताना लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. तेजश्री जैन 

नवीन वर्षाचे औचित्य साधून गुरुवार दि. १ जानेवारी रोजी  नगर परिषदेच्या प्रांगणात नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. तेजश्री जैन यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलत असताना आपले आपले परखड मत मांडले. या वेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून साहेबराव कांबळे, राम देवसरकर, इनायतउल्ला जनाब, तातू देशमुख, ॲड. संतोष जैन, गोपाल अग्रवाल, ॲड. बळीराम मुटकुळे, दत्तराव शिंदे, सतीश नाईक, अजय नरवाडे यांचेसह जनशक्ती पॅनलचे नवनिर्वाचित १७ नगरसेवक उपस्थित होते.

नंदकिशोर अग्रवाल पुढे बोलतांना म्हणाले की, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस पक्ष, उबाठा शिवसेना व जनशक्ती पॅनलच्या नेत्यांनी स्वार्थ बाजूला ठेवून पॅनल तयार केले आहे. मागील कार्यकाळात कार्यभार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी मागील आठ वर्षांपासून नगर परिषदेत भ्रष्टाचाराची एक प्रकारे बिमारी लावून ठेवली होती.परंतु आत्तापर्यंत जे झाले ते झाले, नगर परिषद भ्रष्टाचार मुक्त करायची आहे. 
पॅनलचे नेते नंदकिशोर अग्रवाल

यासाठी विरोधकांनीही आमच्यासोबत राहून काम केले तर विरोधकांच्या सूचनेला ही मान देण्याचे काम जनशक्ती पॅनल कडून होईल. तसेच कर्मचाऱ्यांनी सुद्धा नवनिर्वाचित अध्यक्षांसह सर्व २६ नगरसेवकांच्या सूचनेचे पालन करणे गरजेचे आहे. नगरसेवकपद हे सेवेचे पद असल्याने नगरसेवकांनी नागरिकांचे मुलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राधान्य द्यावे असे आवाहन अग्रवाल यांनी केले. 
मनोगत व्यक्त करताना कॉग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे

यावेळी साहेबराव कांबळे यांनी मागील आठ वर्षाच्या नगरपालिकेच्या प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढत शासन आणि प्रशासनाने मिळून गाडा ओढला तर, शहराची प्रगती होईल, आणि दर्जेदार कामे सुद्धा होतील असे प्रतिपादन केले.या वेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. तेजश्री जैन यांनी शहरवासीयांना निवडणूकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता येत्या पाच वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन आपला निर्धार व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments