या ग्रामपंचायत मध्ये विविध करांच्या माध्यमातून ३१ डिसेंबर अखेर जमा झाले ६४ लाख.

Bay- team aavaj marathi 

जगन नाना पाटील जेष्ठ पत्रकार न्यायडोंगरी, नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील निवासी मालमत्ता वरील घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती, या थकीत करात पन्नास टक्के सूट देण्याचे आव्हान ग्रामपालीकेने करताच कर भरणाऱ्यांनी यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत न्यायडोंगरी ग्रामपालिकेला थकीत करापोटी ३१ डिसेंबर रात्री बारा वाजेपर्यंत एकूण ६४ लाख २३ हजार ४७२ रुपये इतका विक्रमी कर वसूल झाला आहे. या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला काल रात्री बारा वाजेपर्यंत रांगेत उभे राहून लावून कराचा भरणा केला आहे. यात थकीत व्यावसायिक गाळा भाडे व सफाई करात ही ५०% टक्के सवलत दिली गेली असती तर या पेक्षा अधिक कर वसुली झाली असती परंतु शासन निर्णयात तशी तरतुद नसल्याने ती सवलत देण्यात आली नाही असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले

न्यायडोंगरी ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिन्यात इतका प्रचंड प्रमाणात कर वसूल झाला आहे. इतक्या दिवस थकीत करदात्यांकडे बोट दाखवून नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात असमर्थता दाखविणारे ग्रामपंचायत प्रशासन आतातरी या सुविधा देणार का ? असा सवाल करदाते करू लागले आहेत.

 त्यात प्रामुख्याने पंधरा दिवसातून एकदा होणारा अनियमित व अशुद्ध पाणी पुरवठा, अनेक भागात कधीही न होणारी साफसफाई, दिवाबत्ती, बंद पडलेले C.C.T.V. कॅमेरे, आरोग्य विषयी उडालेला बोजवारा, उघड्या गटारांची अवस्था, गाव अंतर्गत काही रस्त्यांची झालेली दुरावस्था यात सुधारणा होणार का? हे बघावे लागेल.


 

Post a Comment

0 Comments