एकाच वेळी चार संख्या बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड

 Bay- team aavaj marathi

सौजन्य -मटा 

ही बातमी आहे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील 'जीवाची वाडी' सारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागातील एका गरीब ऊसतोड मजूर कुटुंबाने संपूर्ण राज्यासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या कुटुंबातील चार सख्ख्या बहिणींनी आपल्या अथांग जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर थेट महाराष्ट्र पोलीस दलात नियुक्ती मिळवून एक नवा इतिहास रचला आहे.  

प्रतिकूल परिस्थिती: या चार बहिणींचे वडील हनुमंत चौरे आणि त्यांच्या पत्नी वर्षानुवर्षे ऊसतोड मजूर म्हणून काम करत आहेत. अत्यंत हलाखीची आणि बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही, या दाम्पत्याने आपल्या चार मुली आणि दोन मुलांच्या शिक्षणात कधीही कोणतीही तडजोड केली नाही.

 उषा, अर्चना, शितल आणि गीतांजली या चार रणरागिणींनी ग्रामीण भागातील मर्यादित सोयीसुविधांचा सामना करत पोलीस भरतीचे स्वप्न पाहिले. त्यांनी केवळ जिद्दीच्या जोरावर मुंबई पोलीस दलात आपले स्थान पक्के केले आहे. एकाच कुटुंबातील चार मुली एकाच वेळी पोलीस दलात भरती होण्याची ही कदाचित पहिलीच घटना असावी.

कठोर मेहनत घरची गरिबी आणि शेतीतील कामांचा ताण असतानाही, या मुलींनी अभ्यासासोबतच शारीरिक सरावावरही तितकाच भर दिला. त्यांच्या या प्रवासात आई-वडिलांनी रक्ताचे पाणी करून त्यांना पाठबळ दिले, ज्याचे फळ आज त्यांना मिळाले आहे. या चौघींच्या अभूतपूर्व यशामुळे केवळ त्यांच्या कुटुंबातच नव्हे, तर संपूर्ण बीड जिल्ह्यात आणि परिसरात आनंदाचे वातावरण आहे. समाजातील अनेक लोकांसाठी आणि ग्रामीण भागातील मुलींसाठी हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे.  

Post a Comment

0 Comments