नांदगाव तालुक्यातील वाखारी येथील किसान माध्यमिक विद्यालय येथे विद्यालयाचे माजी विद्यार्थी, उद्योजक, दानशूर व्यक्तिमत्व भरत आहिरे यांच्या स्वखर्चातून सदर बांधकाम करण्यात येणार आहे. श्री आहिरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले.
तत्पूर्वी महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष विजयजी चोपडा, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनीष चव्हाण हे उपस्थित होते. मुख्याध्यापक खंडू खालकर सर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. विजय चोपडा यांच्या हस्ते भरत आहिरे यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षक प्रतिनिधी सुनील हिंगमीरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी नंदू दवांगे, प्रशांत वाघ, समाधान सोनवणे हे उपस्थित होते.
0 Comments