तीन लाख भाविक पिनाकेश्वर महादेव मंदिरात नतमस्तक तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी; पोलिसांचा चोख बंदोबस्त

 Bay- team aavaj marathi 

नाशिक जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शिवलिंग आणि नांदगाव तालुक्यातील श्री क्षेत्र पिनाकेश्वर महादेव मंदिर श्रावण महिन्यातील पवित्र तिसऱ्या सोमवारच्या निमित्ताने लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

 यावेळी अनवाणी पायाने मध्यप्रदेशातील सेंदवा आणि श्री क्षेत्र शेगाव येथून महिला भाविकांनी तसेच वैजापूर तालुक्यातील सराला बेट, श्रीक्षेत्र वेरूळ, कोपरगाव येथून बेल आणि भोपळ्याचे फळांमध्ये पवित्र जल घेऊन देवास महाभिषेक करणार्या भाविकांची यावर्षी पाऊस नसल्याने अनवाणी पायाने चालतांना पायांना दुखापत झाल्याने मोठ्याप्रमाणात भाविक नंतर मिळेल त्या वाहनाने डोंगर पायथ्याशी आले होते. जलाभिषेक करणार्या भाविकांची संख्येत यंदा पाऊस नसल्याने घट झाली असल्याचे दिसून आले.

जलाभिषेक करण्यासाठी आलेल्या भाविकांनी हळूहळू मंदिर परिसर गाठत विश्रांती घेतली व रविवारी रात्री १२ वाजता जगद्गुरु संत श्री शांतिगिरीजी महाराज व देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाअभिषेक झाल्यानंतर हर महादेव, सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय, गंगामैया की जय, सद्गुरु गंगागिरिजी महाराज की जय, बम बम भोले उद्घोषणा देत जलाभिषेकास सुरुवात केली. रविवारी सकाळपासून सोमवारी रात्री उशिरा पर्यंत मंदिर परिसर देवाच्या आणि संतांच्या उद्घोषणा ने दुमदुमून गेला होता. दोन दिवसात सुमारे तीन लाख भाविकांनी देवाचे दर्शन घेऊन वन पर्यटनाचा आनंद घेतला.

रात्रभर सुरू असलेला जलाभिषेक सोमवारी (ता. ३१) दुपारी अकरा वाजेपर्यंत सुरू होता. त्यासोबत दिवसभर अबालवृद्धांसह महिला आणि भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. येथे आलेल्या भाविकांना प्राथमिक आरोग्य केंद्र बोलठाण आणि स्थानिक डॉक्टरांनी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार उपलब्ध करून दिले होते.

देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अर्जुन बंडू पाटील, उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, सचिव बाबासाहेब चव्हाण, कोषाध्यक्ष रामदास चव्हाण, शिवाजी वर्पे शरद पवार, गावातील तरुण मित्र मंडळ यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. दरवर्षी येणार्या भाविकांनी येथे सुरू असलेल्या विकास काम बघून समाधान व्यक्त केले.

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जातेगाव ग्रामस्थांच्या वतीने आणि आ.सुहास अण्णा कांदे, व नांदगाव चे नगराध्यक्ष सागर हिरे यांच्या वतीने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना चहा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 

पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे व स.पो.नि सतीश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भास्कर बस्ते पोलिस शिपाई परमेश्वर श्रीखंडे तसेच मनमाड येथील दंगा रोधक पथकं आणि खाजगी सुरक्षा रक्षकांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने तसेच रहदारी चे योग्य नियोजन केल्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. व रहदारी ठप्प झाली नाही.

Post a Comment

0 Comments