नांदगाव तालुक्यातील पुर्व भागातील रस्त्यांची वाताहत, हा रस्ताच अवजड वाहतुकीसाठी योग्य नसल्याचा खुलासा तर राजकीय पक्षाच्या नेत्यांनीच दुर्लक्ष केल्याची चर्चा.

 Bay- team aavaj marathi 

दि १२... नांदगाव तालुक्यातील जातेगाव बोलठाण मार्गे देशातील उत्तरेकडील राज्यांना मराठवाडा आणि दक्षिणेतील राज्यांना जोडणारा व कनेक्टिव्हिटी साठीचा जवळच्या कासारी जवळील चांदेश्वरी या अवघड वळणाच्या घाटातील रस्त्याची मोठमोठे खड्डे पडल्याने चाळीस किलोमीटर अंतर जाण्यासाठी बस ला दिड तासापेक्षा जास्त अवधी लागत आहे. औट्राम घाट बंद करण्यात आल्याने चाळीसगाव मार्गे जाणारी वाहतूक मनेगांव फाटा, बोलठाण जातेगाव, कासारी ते मन्ह्यड फाटा या मार्गाने वळविण्यात आल्याने संपूर्ण ४० किलोमीटर रस्त्याची चाळण झाल्याने वाट लागली आहे. त्याचप्रमाणे ढेकू गावापासून पडधाडी मार्गे जाणारा न्यायडोंगरी रस्ता आणि घाटातील रस्त्यावर देखील मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याकडे तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसह सार्वजनिक बांधकाम उप विभाग नांदगाव ने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
चांदेश्वरी घाटात अवघड वळणावर बंद पडलेली ट्रक

सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड येथून चाळीसगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावरील औट्राम घाट गेल्या वर्षभरापूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशाने अवजड वाहनांसाठी बंद केल्यामुळे त्या रस्त्याने जाणारी वाहतूक शिऊर बंगला - लोणी - तलवाडा मार्गाने वळविण्यात आली होती.
घाटातील रस्त्यावर पडलेले खड्डे 
 परंतु तलवाडा ते कासारी यादरम्यान छत्रपती संभाजी नगर हाद्दीत नवीन सिमेंट रस्त्याचे रस्त्याचे काम सुरू असून देशातील दक्षिण- उत्तर राज्यांमध्ये जाणारे मोठमोठे मालवाहू ट्रक खाजगी लक्झरी बसेस, तापी नदीची वाळू वाहतूक करणारे शेकडो वाहने आणि बोलठाण येथे बाजार समिती असल्याने तेथे शेतातील माल विक्रीसाठी येणारे असे रात्रंदिवस दररोज हजारो वाहनांच्या अतिरिक्त वाहतूक सुरू झाल्याने नांदगाव तालुक्यातील रोहिले या गावाजवळ असलेल्या खारी खामगाव मध्यम प्रकल्पापासून सुमारे ते मन्हाडफाटा दरम्यान ४० कि.मी. रस्त्याची चाळण झाली आहे.त्याचप्रमाणे ढेकू गावापासून पडधाडी मार्गे जाणारा न्यायडोंगरी रस्ता आणि घाटातील रस्त्यावर देखील मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 
नांदगाव ते छ संभाजी म. नगर जळगाव फाट्याजवळ फुटलेला रस्ता 
या रस्त्याकडे तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसह सार्वजनिक बांधकाम उपविभाग नांदगाव ने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत तालुक्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, त्यांनी काढलेल्या निष्कर्षानुसार हा रस्ता सध्या सुरू असलेल्या अवजड वाहतुकीच्या हिशोबाने तयार केलेला नसल्याने त्याला विलाज नाही असे उत्तर दिले.
नांदगाव ते छ संभाजी म. नगर जळगाव फाट्याजवळ फुटलेला रस्ता

 विशेष: जास्त रहदारीचा असलेल्या नांदगाव रस्त्यावरील कासारी जवळील चांदेश्वरी घाटातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दररोज अनेक वाहने नादुरुस्त होवून रस्त्यावर उभी राहिल्याने रहदारी ठप्प होत असल्याने स्थानिक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याच घाटात अवघड वळणाच्या ठिकाणी कमकुवत बांधकाम करण्यात आलेली संरक्षण भिंत पडल्याने या ठिकाणी अनेक वाहने खोल दरीत गेल्यामुळे अनेकांचे जीव गेलेले आहेत.

याबाबत नांदगाव येथील सार्वजनिक बांधकाम उप विभागाच्या वतीने कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही. एकंदरीत औट्राम घाट बंद करण्यात आल्याने मनेगांव फाटा, बोलठाण जातेगाव, कासारी ते मन्ह्यड फाटा हा रस्ता नव्याने तयार करण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments