चांदेश्वरी घाटातील थरारक प्रकार अवघड वळणावर गाडीचे पुढचे चाक तरंगले हवेत, मोठा अनर्थ टळला.

 Bay- team aavaj marathi 

special report by Awaaz Marathi news network 

 दि.13.... नांदगाव तालुक्यातील कासारी गावाजवळील चांदेश्वरी या अवघड वळणाच्या घाटात आज दि. 13 रोजी शनिवारी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान हरियाणा राज्यातील एक आयशर टेम्पो क्रमांक H.R. 55/AS-2160 हा लसूण घेऊन छत्रपती संभाजी महाराज नगर च्या दिशेने घाट चढून जात असताना घाटातील अवघड वळणावर चढा असलेल्या ठिकाणी अचानकच या टेम्पो चे पुढचे दोन्ही चाक तीन ते चार फूट हवेत तरंगल्यामुळे चालकाची धांदल उडाली, व चार-पाच फूट पाठीमागे सरकली. सुदैवाने पाठीमागे दुसरे काही वाहन नसल्यामुळे मोठा अनर्थ टाळला या घाटातील याच ठिकाण वरून आतापर्यंत 50 पेक्षा अधिक लहान मोठे वाहने ब्रेक निकामी झाल्याने, चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने व विविध कारणांनी थांबले नसल्याने समोरच असलेल्या खोल दरीमध्ये जाऊन अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले आहे.

 या ठिकाणी आणि घाटातील सर्वच रस्ता पहा खड्डेमय झाला असल्यामुळे दुचाकीसह लहान मोठे सर्वच वाहनांच्या चालकांना खड्डे चुकण्याची जणू शर्यतच करावी लागते. तरी देखील या ना त्या खड्ड्यात गाडी जाते आणि गाडीची गती कमी झाल्यानंतर एकतर गाडी थांबून जाते. किंवा गाडी जागेवर न थांबल्यास अपघात होतो. आज अशीच प्रचिती या घाटामध्ये आली, काही वेळातच पाठीमागून येणाऱ्या दुचाकी स्वाराने आपला जीव मुठीत धरून टायरला दगडाच्या ओटी लावल्यामुळे ही गाडी जागेवर थांबली. परिणामी काही वेळातच घाटात दोन्हीकडून येणाऱ्या वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या. इतर वाहन चालकांनी केलेल्या मदतीमुळे या टेम्पो चे हवेत तरंगलेले पुढचे दोन्ही चाक जमिनीवर टेकल्यानंतर ही गाडी मागे घेवून पुन्हा घाटचढवीण्यात आली.

भविष्यात वाहनांचे अपघात होऊन निरपराध लोकांना आपले प्राण गमवावे लागणार नाही, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या घाटाचे रुंदीकरण करणे, त्याच प्रमाणे घाटात ठिकठिकाणी असलेला मोठ्या प्रमाणात असलेला चढ कमी करणे, आणि रस्त्याच्या बाजूला मजबूत संरक्षण भिंतीचे बांधकाम इत्यादी उपाययोजना करणे आवश्यक आहे. 


Post a Comment

0 Comments