विद्यालयात कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे यांची पुण्यतिथी व ' विजय दिन साजरा....

Bay- team aavaj marathi 

 शरद आहेर सर पत्रकार नांदगाव नाशिक 

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयामध्ये कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे साहेब यांचा पुण्यतिथी निमित्त त्यांचा प्रतिमेचे पूजन व १९७१ च्या युध्दात शहीद झालेल्या भारतमातेच्या विरजवानांना श्रद्धांजली अर्पण करून विजय दिन साजरा करण्यात आला

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे ह्या होत्या,अध्यक्षीय मनोगतातून त्यांनी कर्मवीर हांडे जीवनप्रवास म्हणजे,कोणतेही श्रेय न घेता केवळ कार्य करत राहणे. निस्वार्थी सेवा, कठोर परिश्रम आणि शैक्षणिक कार्याप्रती असलेली निष्ठा यामुळे मविप्र संस्था आज लाखो विद्यार्थ्यांना आज ज्ञानदान करत आहे. विजय दिवस सन १९७१ च्या भारत- पाकिस्तान युध्दात भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या दिवस भारतीय सशस्त्र दलांचे शौर्य, पराक्रम आणि बलिदान यांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.असे मनोगत व्यक्त केले.

तर उपशिक्षिका सुनिता निकम यांनी विद्यार्थ्यांना कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देताना म्हणाल्या की, कर्मवीर हांडे साहेबांनी 'ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचले पाहिजे'हे ध्येय समोर ठेवून त्यांनी संस्थेच्या शाळा, महाविद्यालय व वसतिगृहाच्या ग्रामीण व आदिवासी भागात विस्तार केला.इगतपुरी चा 'भाग लढा' हा त्यांच्या जीवनातील महत्त्वाची घटना होय. तत्कालीन मुंबई राज्याच्या सरकारने गुजरातच्या शेतकऱ्यांना तांदळाचा भाव जास्त तर महाराष्ट्राचा शेतकऱ्यांना कमी भाव दिला. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा दिला.अशी उपस्थितांना माहिती दिली.

याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख शरद आहेर यांनी केले.








Post a Comment

0 Comments