Bay- team aavaj marathi
सिताराम पिंगळे पत्रकार मांडवड [नांदगाव]
नांदगाव तालुक्यातील हिसवळ खुर्द येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीत चेअरमनपदी सौ. वर्षा संजय आहेर व व्हाईस चेअरमनपदी नारायण जयराम आहेर यांची बिनविरोध निवड झाली.निवडणूक निर्णय अधिकारी विजय उगलमुगले हे होते त्यांच्या अध्यक्षतेखाली काल नांदगाव येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात दुपारी 11 वाजता संस्थेची बैठक झाली.चेअरमन पदासाठी सौ. वर्षा संजय आहेर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यावर सूचक विजय पंढरीनाथ आहेर व अनुमोदक संतोष बाबुराव आहेर यांच्या स्वाक्षरी होत्या.
व्हाईस चेअरमन पदासाठी नारायण जयराम आहेर यांचा अर्ज दाखल झाला. त्यावर सूचक मोहन एकनाथ आहेर व अनुमोदक तुळशीराम पुंजाबा सदगीर यांच्या स्वाक्षरी होत्या.प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दोन्ही पदे बिनविरोध झाल्याचे घोषित केले.यावेळी संचालक मंडळातील डॉ. विजय कदम, मोहन दादा आहेर, संतोष आहेर, विजय आहेर, सौ. शीलाताई आहेर, विश्वास आहेर, प्रशांत आहेर, सोजेराव बिन्नर, पांडुरंग दैने, तुळशीराम सदगीर यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते निवडीनंतर आ. सुहास अण्णा कांदे यांचे वतीने नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन प्रमोद भाबड यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
याप्रसंगी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अंकुश कातकडे, श्रावण बोगिर, सरपंच कैलास फुलमाळी, मा. चेअरमन विलास आहेर,सुरेश आहेर, दशरथ आहेर, संभाजी आहेर,भरत आहेर,नानासाहेब आहेर,राजेंद्र आहेर, संतोष आहेर,बाजीराव आहेर, सुदाम आहेर,मनोहर आहेर, सागर आहेर, रमेश आहेर,कैलास आहेर,किशोर आहेर, शुभम आहेर,प्रकाश नाना आहेर, रितेश आहेर, आप्पासाहेब काळे, योगेश आहेर, शिवाजी आहेर सौ भाग्यश्री मोरे, निर्मलाताई सोनवणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-



0 Comments