नांदगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), येथे प्रथम वर्षासाठी नव्याने प्रवेश घेतलेल्या वीजतंत्री, जोडारी व संधाता या तीन ट्रेडच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी शाखेच्या वतीने नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना ITI मधील प्रशिक्षणाचे महत्त्व, नियमित उपस्थिती, शिस्त, प्रात्यक्षिक प्रशिक्षण तसेच कौशल्यावर आधारित शिक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. औद्योगिक क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मोठी गरज असून विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचा पुरेपूर लाभ घेऊन उत्कृष्ट कारागीर म्हणून घडावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमामुळे नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनीही आपल्या प्रशिक्षणाबाबत सकारात्मक प्रतिसाद देत मनापासून सहभाग नोंदविला.कार्यक्रमास शाखेचे प्राचार्य एच. बी. ठाकरे, सर्व निदेशक, कर्मचारी तसेच वीजतंत्री, जोडारी व संधाता ट्रेडचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments