कासलीवाल विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

Bay- team aavaj marathi 

विजय चोपडा जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूल व सौ. क. मा. कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात देशाचा 80 वा स्वातंत्र्यदिन देश भक्तीमय वातावरणात व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नांदगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष सागर हिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर मनोगते व्यक्त करून स्वातंत्र्यलढ्यातील वीरांच्या त्यागाला अभिवादन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत गायन, मनमोहक नृत्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण परिसरात देशभक्तीचा उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

यानंतर मागील शैक्षणिक वर्षात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूल व सौ. क. मा. कासलीवाल माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववी, दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

तसेच जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूलमधील विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये उशू जिल्हास्तरीय स्पर्धा, के. के. वाघ विद्यालय, नाशिक येथे झालेली वक्तृत्व स्पर्धा, राज्यस्तरीय सामान्य ज्ञान मंथन परीक्षा, सी. व्ही. रमण बाल वैज्ञानिक स्पर्धा तसेच इंटरनॅशनल टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षा यामध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.विद्यार्थ्यांच्या या यशामागे विशेष मार्गदर्शन व परिश्रम घेणाऱ्या जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूलमधील शिक्षकांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

सौ. क. मा. कासलीवाल प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. सन 2026 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत तालुका व केंद्र स्तरावर तसेच मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत राज्य व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी नांदगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष सागर हिरे, संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल, उपाध्यक्ष सुशीलकुमार कासलीवाल, सचिव विजय चोपडा, सहसचिव प्रमिलाताई कासलीवाल, विश्वस्त रिखबचंद कासलीवाल, आनंद कासलीवाल,महेंद्र चांदीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, तसेच कमलेश कासलीवाल ,अंकुर कासलीवाल, अभिजीत कासलीवाल, प्रतिक कासलीवाल, कुणाल कासलीवाल, श्रीमती शोभाकाकीजी कासलीवाल, निर्मलाताई कासलीवाल, प्रिन्सिपल मनी चावला, मुख्याध्यापक गोरख डफाळ, विशाल सावंत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ जगताप व पल्लवी रावअंदोरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments