जय बाबाजी भक्त मंडळाचा उपक्रम श्री पिनाकेश्वर देवस्थान येथे केली स्वच्छता

Bay- team aavaj marathi 

जय बाबाजी भक्त परिवाराचा अभिनव उपक्रम कुठलाही बडेजाव नाही फोटोसेशन नाही, कामाशी काम आणि काम झाल्यावर  सोबत आणलेला जेवणाचा डबा खाऊन सायंकाळी आपल्या घरी परत गेले.


याबाबत सविस्तर वृत्त असे की,नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून उत्तरेस सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगराच्या शिखरावर असलेल्या श्री क्षेत्र पिनाकेश्वर पवित्र श्रवण महिन्याचे औचित्य साधून विस लाखांपेक्षा अधिक भाविकांनी देवाचे दर्शन घेऊन वन पर्यटनाचा आनंद घेतला. तर प्रसाद बेल फुले, कटलरी, बेंटेक्स ज्वेलरी,खेळणी, खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या, रहाटगाडगे इत्यादी सुमारे एक हजार विविध प्रकारच्या व्यवसायीकांनी महिनाभर कायमस्वरूपी आपली दुकाने थाटून व्यवसाय करुन लाखो रुपयांची कमाई करुन निघून गेले. महिनाभर सुरू असलेल्या यात्रेमुळे मंदिर परिसरात कचरा झाला. देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व दुकानदारांना व्यवसायामुळे होणाऱ्या विविध प्रकारच्या करण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सुचना करुन सुध्दा सर्वच व्यवसायीकांनी चौथा श्रावणी सोमवार झाल्यानंतर आप आपले दुकाने उचलून निघून गेले. 

त्यामुळे मंदिरात तसेच परिसरात अस्वच्छता झाली होती. वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील जय बाबाजी भक्त परिवारातील सदस्यांनी कुठल्याही प्रकारचा बडेजाव न करता, मागिल दहा वर्षांपासून वर्षातील महत्वाचा सण असलेल्या बैल पोळ्याच्या दिवशी सकाळी वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील जय बाबाजी भक्त मंडळ श्री पिनाकेश्वर देवस्थान येथे येतात येताना घरुनच स्वतःचा जेवणाचा डबा स्वच्छता करण्यासाठी लागणारे झाडू मंदिर धुण्यासाठी डिटर्जंट पावडर वगैरे सामान स्वतःचे पैसे घेऊन येतात. 

सालाबादप्रमाणे यावर्षी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम  ३० पुरुष व महिला सेवकांनी निस्वार्थ सेवा करुन देवाची पूजा आराधना देवदर्शन घेऊन, कुठल्याही प्रकारचा बडेजाव न करता फोटोसेशन न करता आपले काम करून स्वतः सोबत आणलेला जेवणाचा डबा खाऊन सायंकाळी आपल्या घरी निघून गेले. 

Post a Comment

0 Comments