21 वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा नाशिकचा व्यापारी, SIR मुळे अडकला जाळ्यात !!

 Bay- team aavaj marathi 

सौजन्य न्यूज 18 

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण SIR मोहिमेमुळे या अट्टल फरार आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. एस.आय. आर प्रक्रियेमुळे २१ वर्षापासून फरार असलेला आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. सुमारे २१ वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारा नाशिक मधील व्यावसायिक अवधूत चाफेकर (वय ६५) अखेर मुंबई पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमे अंतर्गत या अट्टल फरार आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार. चाफेकर याच्यावर सन 2005 मध्ये सुमारे 9 लाख रुपयांच्या फसवणुकीचा आरोप होता आणि याप्रकरणी न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. मात्र, तेव्हापासून तो सतत फरार होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाफेकर गेल्या दोन दशकांपासून नाशिकमध्ये आपली खरी ओळख लपवून राहत होता. कोणालाही संशय येऊ नये यासाठी त्याने स्वतःच्या नावावर कधीही मोबाईल कनेक्शन घेतले नाही आणि ओळख लपविण्यासाठी तो इतरांच्या ओळखपत्रांचा वापर करत असे. नाशिकमध्ये राहून त्याने इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसायही उभा केला होता.

'एसआयआर' मोहिमेमुळे फुटला भंडाफोड

निवडणूक आयोगातर्फे सध्या महाराष्ट्रात विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) मोहीम राबवली जात आहे. 2002 नंतर पहिल्यांदाच राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदार याद्यांची सखोल तपासणी केली जात आहे. या मोहिमेदरम्यान निवडणूक कर्मचाऱ्यांच्या घरोघरी जाऊन चाललेल्या पडताळणी मुळे चाफेकर याला जुन्या मतदार यादीतील आपले नाव व तपशील दुरुस्त करण्याचा मोह झाला.

याच मोहिमेदरम्यान मुंबईच्या बीकेसी (BKC) पोलीस ठाण्याने 'एसआयआर' अंतर्गत काम करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांशी समन्वय साधला. चाफेकरने जुन्या मतदार यादीतील आपल्या माहितीची पडताळणी पूर्ण करून एका हॉटेलमध्ये चेक-इन करताच, पोलिसांनी तत्परतेने धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. अत्यंत नियोजनबद्ध रीतीने ही कारवाई करण्यात आली. अटकेनंतर चाफेकर याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी न्यायालयात हजर करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments