Bay- team aavaj marathi
दि ७.... श्री क्षेत्र पिनाकेश्वर महादेवाच्या डोंगरावर पवित्र श्रवण महिन्यातील शेवटच्या सोमवारी पहाटे चार वाजेपासून सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांची रीघ लागली होती. देवस्थान न्यासाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज श्रावण महिन्यातील सोमवार आणि एकादशी चे औचित्य साधून सुमारे दिड लाखांपेक्षा अधिक महिला व अबालवृद्ध, व तरुण भाविकांनी दुचाकी चार चाकी कार गाडी, टेपो, पिकप, ट्रॅक्टर इत्यादी वाहनातून येवून देवाच्या चरणी नतमस्तक झाले. मंदिर प्रशासनाने मंदिरात छत्रपती संभाजी महाराज नगर येथील खासगी सुरक्षारक्षक तैनात केल्याने आलेल्या सर्व भाविकांचे देवदर्शन झाल्यानें भाविकांनी समान व्यक्त केले.
येथे श्रावण महिन्यात महिनाभर दररोज भाविक सत्यनारायण पूजा व अभिषेक वगैरे धार्मिक विधी करून अन्नदान करतात मात्र आज एकादशी असल्याने हिंदू धर्मातील रिवाजानुसार धार्मिक विधी बंद असल्याने अन्नदान बंद असल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी देवदर्शन झाल्यानंतर स्वतःच व्यवस्था करुन वन भोजनाचा आस्वाद घेत वन पर्यटनाचा आनंद घेतला. 
बहुतेक भाविकांनी येथील पिनाकेश्वराचे दर्शन घेऊन येथून ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र वेरुळ येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री घृष्णेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी पदार्पण केले. महिनाभर येथे यात्रेचे स्वरूप आल्याने स्थानिक व नांदगाव, चाळीसगाव,येवला कन्नड तालुक्यातील प्रसादाच्या दुकानांसह बेंटेक्स ज्वेलरी, कटलरी, खाद्यपदार्थ इत्यादी सुमारे सातशे ते आठशे दुकानदारांनी थाटली होती. सर्वांमिळुण दिड ते दोन कोटी रुपयांची उलाढाल झाली असावी असे व्यवसायीकांनी या वेळी सांगितले.
या सर्वांचा चांगला व्यवसाय झाल्यानें सर्व व्यवसायीक आनंदी बघायला मिळाले. दुपारी दोन वाजेनंतर अचानक भाविकांची गर्दी वाढल्याने येणाऱ्या व जानार्या वाहनांची गर्दी झाल्यामुळे दिड ते दोन तास वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.
नांदगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत सोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भास्कर बस्ते पोलिस शिपाई परमेश्वर श्रीखंडे व पोलीस बांधवांनी गर्दीच्या वेळी चोख बंदोबस्त ठेवल्याने अपवाद वगळता कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही.
0 Comments