नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे संजय आत्माराम पवार वय ३५ वर्ष या तरुणाचा मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान आंघोळ करण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, संजय पवार हा येथील वसंत नगर शिवारातील बोरसे वस्ती जवळ असलेला सटवाई बंधारा (पाझर तलाव) येथे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान आंघोळ करण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला असल्याची माहिती त्याचा लहान भाऊ बारकू आत्माराम पवार याने नांदगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून पोलिसांच्या समक्ष मयत संजय पवार याची सायंकाळी उशिरापर्यंत येथील आठ ते दहा तरुणांनी पाण्यात शोधाशोध केली परंतु काल अंधार झाल्यानंतर शोधकार्य थांबविण्यात आले. व आज बुधवारी सकाळपासून पुन्हा काही तरुणांनी पाण्यात उतरून शोधकार्य सुरू केले असता, मयत तलावाच्या गाळात आढळून आला. त्यास पोलिस आणि पंचांसमक्ष पाण्याच्या बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात करुन अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.असून बुधवारी सायंकाळी उशिरा शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयताच्या पश्चात आई पत्नी चार मुली एक मुलगा भाऊ भावजय असा परिवार आहे. वरील घटनेची नांदगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यु रजि क्र. 98/2026 BNSS 194 प्रमाणे नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक यशवंत सोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भास्कर बस्ते हे करत आहेत.
0 Comments