नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील शेतकऱ्यांनी एका खाजगी कंपनीचे मका पिकावरील तणनाशक निकृष्ट निघाल्याने फवारणी करुन कुठल्याही प्रकारचा उपयोग झाला नसल्याने शेतकर्यांना औषधांचा आणि फवारणी करण्यासाठी चा मोठा आर्थिक भुर्दंड बसल्याने येथील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांना दि ३१ ऑगस्ट रोजी निवेदन दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले की, मक्याचे सहा ते आठ इंच उंचीचे पिक असतांनाच एका खाजगी कंपनीच्या तणनाशकाची कंपनीच्या नियमानुसार फवारणी केली.परंतु फवारणी केलेल्या तण नाशकाचा कुठल्याही प्रकारचा उपयोग झाला नाही. याची ऑनलाईन पध्दतीने कंपनीकडे तक्रार केल्यानंतर त्या कंपनीचे एक कर्मचारी पाहाणी करण्यासाठी आले.
त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण न करता उलट कंपनी ची बाजू घेऊन फवारणी केलेल्या औषधाचा दोष नसून बाधित शेतकर्यांना रब्बी हंगामातील पिकांवर फवारणी करण्यासाठी आमची कंपनी आपल्याला मोफत औषधांचा पुरवठा करेल असे आमिष दाखवून निघून गेले. परिणामी अर्जावर सह्या करणार्या औषधांची फवारणी करुन मका पिकासाठी उपयोग न होता उलट आर्थिक भुर्दंड बसला आहे असे निवेदनात म्हटले आहे.
0 Comments