याठिकाणी पोलीसांनी शेतात जमिनीखाली पुरून ठेवलेले तब्बल सव्वा दोन कोटी रुपये केले हस्तगत

 Bay- team aavaj marathi 

पश्चिम बंगाल मध्ये उत्तर 24 परगणा येथे TMC नेते दीपंकर भट्टाचार्य यांच्या शेतातात पुरुन  2 कोटी 24 लाख रोकड जप्त करण्यात आली.

अजय देवगण च्या रेड सिनेमात ज्याप्रमाणे भ्रष्ट अधिकारी उसाच्या शेतात सोनं-नाणं आणि काळा पैसा लपवून ठेवतो, अगदी तसाच प्रकार पश्चिम बंगालमध्ये प्रत्यक्षात घडला. बंगालच्या राजकारणातून पुन्हा एकदा नोटांचा ढीग आणि भ्रष्टाचाराचा एक अत्यंत खळबळजनक चेहरा समोर आला. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बादुरिया नगरपालिकेचे तृणमूल काँग्रेसचे नेते दीपंकर भट्टाचार्य यांच्यावर झालेल्या कारवाईने सध्या संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. 

TMC च्या नेत्यानं शेतात खड्डा खणून लपवून ठेवला होता. पोलिसांनी जेव्हा ही जमीन खणली, तेव्हा तिथून तब्बल 2 कोटी 24 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा ड्रामा काही दिवसांपूर्वीच सुरू झाला होता. बादुरिया नगरपालिकेचे अध्यक्ष दीपंकर भट्टाचार्य यांना पोलिसांनी एका हॉटेलमधून अटक केली होती. त्यानंतर कोर्टाने त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर अखेर दीपंकर यांचा धीर सुटला आणि त्यांनी शेतात लपवलेल्या पैशांचे गुपित समोर आलं. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी दीपंकर भट्टाचार्य यांना सोबत घेतले आणि थेट बादुरिया येथील टीएमसी कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या ज्युटच्या शेतात आणि बागेत धाड टाकली. शेतात पोहोचल्यानंतर पोलिसांनी संशयास्पद जागा शोधून काढली आणि तिथे खोदकाम सुरू केले. जसजशी जमीन खोदली तसतसे तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक जण चक्रावला. जमिनीतून पोलिसांनी चक्क ४ मोठ्या ट्रॉली बॅग आणि १ ज्युटचे मोठे पोते बाहेर काढले. या सर्व बॅगा आणि पोते 500 रुपयांच्या नोटांच्या गड्ड्यांनी गच्च भरलेले होते.

 पोलिसांनी तातडीने नोटा मोजण्याची मशीन मागवली, तेव्हा हा आकडा तब्बल 2 कोटी 24 लाख रुपयांवर जाऊन पोहोचला. शेतातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर काळा पैसा निघाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण परिसरात गावकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली. गोंधळ वाढल्यामुळे पोलिसांनी बंदोबस्तही वाढवला. दीपंकर भट्टाचार्य यांचे कारनामे केवळ शेतातल्या पैसांपुरते मर्यादित नाहीत. 

धक्कादायक बाब म्हणजे, या ठिकाणी पोलिसांना मोठ्या प्रमाणावर जळालेली सरकारी कागदपत्रेही सापडली आहेत, जी पुरावा नष्ट करण्यासाठी जाळण्यात आली होती. भ्रष्टाचाराचे हे जाळे केवळ बादुरियापुरते मर्यादित नाही. याच जिल्ह्यातील गोबरडांगा भागातही पोलिसांनी दुसरी मोठी कारवाई केली आहे. 



Post a Comment

0 Comments