राज्यातील निराधार विधवा, घटस्फोटीत, दिव्यांग व्यक्ती व 65 वर्षांपेक्षा अधिक वयाचे निराधार वृध्द पात्र व्यक्तींना राज्य व केंद्र शासन पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दरमहा डी.बी.टी. प्रणाली व्दारे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. त्यासाठी संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना वर्षातून एकदा 1 एप्रिल ते 30 जुन या कालावधीत हयात (जिवंत) असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
परंतु अद्यापही नांदगाव तालुक्यातील काही लाभार्थ्यांनी हयात (जिवंत) असल्याचे प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने सादर केलेले नाही. तरी ज्या लाभार्थ्यांनी अद्याप त्यांचे हयात प्रमाणपत्र सादर केलेले नाही अशा लाभार्थ्यांनी नजीकचे आपले सरकार केंद्र, सी एस सी केंद्र, सेतु केंद्र चालक अथवा गावचे तलाठी/कोतवाल यांचेशी संपर्क साधुन हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने (डिजीटल लाईफ सर्टिफिकेट) तात्काळ 31 जुलै 2026 पुर्वी सादर करावे. अन्यथा शासनाकडून दरमहा दिले जाणारे अर्थसहाय्य बंद होईल अशी माहिती तहसिलदार श्री. सुनिल सौदाणे यांनी मंगळवार दि 21 रोजी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
0 Comments