घरातील एका तरणाबांड लेकाच्या अकाली निधनानं कुटुंबावर शोककळा पसरली. धक्क्यात असलेलं कुटुंब त्याचं पार्थिव घेऊन अंत्यविधी साठी निघाले. तितक्यात परिसरातील सदस्यांना मृत समजलेल्या तरुणाचा कॉल आला.कुटुंबासह, वैद्यकीय यंत्रणेला चकित करणारी घटना जम्मू शहरात घडली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की a २७ वर्षीय विशाल नावाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याचं समजून त्याच्या अंत्यविधी ची तयारी सुरू झाली. त्यासाठी त्याचं कुटुंब सरकारी वैद्यकीय रुग्णालयातून पार्थिव घेऊन निघालं. रुग्णवाहिका स्मशानाच्या दिशेनं जात असताच अचानक फोन वाजला. पलीकडून आवाज आला, मी विशाल बोलतोय. मी जिवंत आहे. तुम्ही जी बॉडी नेताय, ती माझी नाही. विशाल चा आवाज आणि त्याचे शब्द ऐकताच कुटुंबियांचे दु:ख क्षणात दूर झालं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. यानंतर रुग्णवाहिका पुन्हा सरकारी वैद्यकीय रुग्णालयात पोहोचली.शव पुन्हा शवागारात ठेवण्यात आलं.
बेपत्ता तरुण विशाल हा तीन दिवसांपासून बेपत्ता होता. याच दरम्यान सरकारी वैद्यकीय रुग्णालयाच्या शवागारात एक अज्ञात शव सापडलं. त्याच्या चेहऱ्याची ठेवण आणि अंगकाठी विशाल शी मिळतीजुळती होती. त्यामुळे तो विशालचे असावे असा कुटुंबाचा समज झाला. कुटुंबियांनी ओळख पटवल्यावर पोलीस-प्रशासनानं शव त्यांच्या ताब्यात दिलं. सर्व कायदेशीर बाबींची प्रक्रिया पूर्ण करुन कुटुंबीय शव घेऊन अंत्यविधीसाठी निघाले. रुग्णवाहिका रस्त्यात असताना विशालने त्याच्या एका नातेवाईकाच्या मोबाईल हून कुटुंबियांना कॉल केला. मी सुरक्षित असून जम्मूतच आहे, असं विशालने सांगितलं. ते ऐकताच कुटुंबाला धक्काच बसला. दु:खी वातावरण क्षणात बदललं. कुटुंबियांच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहू लागले.
विशाल जिवंत असल्यानं शवागारातील शव नेमकं कोणाचं आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. तीन दिवसांनंतर ही त्याची ओळख पटलेली नाही. त्या शवाची ओळख पटवण्याची प्रक्रिया पोलिसांनी पुन्हा सुरू केली आहे.
0 Comments