सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना नाशिक जिल्ह्यात नांदगांव विधासनसभा मतदार संघात गेल्या काही दिवसांपासून हायहोल्टेज घटना घडत आहेत. महायुतीमध्ये उमेदवारी विद्यमान आ सुहास अण्णा कांदे प्रमुख दावेदार असल्याचे शिवसेना शिंदे गटाकडून सांगितले जात असताना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे व मुंबई महानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समिर भुजबळ उमेदवारी साठी मैदानात उतरले असल्याचे बघावयास मिळत आहे.
अशातच मराठा समाजाकडून तथा मनोज जरांगे पाटील यांचे वतीने विधानसभेचे प्रमुख दावेदार उमेदवार म्हणून डाॅ. रोहन बोरसे यांचे नाव जाहिर केल्याचे आंदोलक भास्कर झाल्टे यांनी जाहीर केले त्या नंतर प्रथम साकोरा ता.नांदगांव येथून डाॅ बोरसे यांना जाहीर पाठिंबा देणारी पहिली बैठक कपालेश्वर मंदीर सभा मंडपात संपन्न झाली. तर ग्रामीण भागात ठिकठिकाणी डॉ रोहन बोरसे यांच्या उमेदवारीचे स्वागत होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून नांदगाव विधानसभा मतदारसंघासाठी डॉ बोरसे यांची उमेदवारी पक्की झाली असल्याने त्यांच्या होम ग्राउंड वर नागरिकांनी एकत्र येऊन त्यांना पाठींबा देवून त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले
याप्रसंगी सभे नंतर डाॅ. बोरसे यांनी आपले मत व्यक्त करताना मनोगत व्यक्त करताना म्हणाले. की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जन्मभूमी साकोरे येथील माझ्या हक्काच्या,आपुलकीच्या नागरिकांच्या गाठी-भेटी घेण्यात आल्या. साकोरेकरांनी मला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले. यापुढेही अशीच खंबीर साथ देण्याचा साकोरेकरांनी निर्धार केला. या प्रेमरूपी आशीर्वादाबद्दल मी त्यांचे मनस्वी ऋण व्यक्त करतो. अशी प्रतिक्रिया Dr.RohanBorse यांनी यावेळी दिली.
0 Comments