नांदगाव च्या डॉ. ख्याती हर्षद तुसे (देढीया) यांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

 Bay- team aavaj marathi 

वैद्यकीय क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता Artificial Intelligence या विषयावर घेतलेल्या ऑनलाइन प्रक्षेपणाला सर्वाधिक प्रेक्षक लाभल्याने या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. या ऐतिहासिक उपक्रमात  डॉ.ख्याती हर्षद तुसे (देढीया) यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.

ही ऑनलाइन शैक्षणिक सत्रे नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस  NBEMS, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय  MOHFW व भारत सरकार यांच्या वतीने २५ फेब्रुवारी २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात “आरोग्य सेवेमधील कृत्रिम बुद्धिमत्ता” या विषयावर थेट प्रक्षेपणाद्वारे मोठ्या संख्येने प्रेक्षक सहभागी झाले.

या उपक्रमाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे  ‘The Most Viewers of an Artificial Intelligence in Healthcare Lesson Live Stream on YouTube’ या विक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. या विक्रमात उत्तम प्रतिसादाबद्दल डॉ. ख्याती हर्षद तुसे ( देढीया) यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे अधिकृत प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
त्यांच्या या यशामुळे कुटुंबीय व मित्र परिवारात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments