छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद,विविध दाखल्यांचे केले वितरण

 Bay- team aavaj marathi

नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील जातेगाव महसूल मंडलात शनिवारी दि.१४ रोजी राज्य सरकारच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना द्वारे शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणे व महसूल विषयक प्रश्न त्वरित निकाली काढणे हा मुख्य उद्देश ठेवून तालुका महसूल प्रशासनाने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ग्रामपालीका कार्यालयासमोर मोठा मंडप देवून सकाळी ९ वाजता आयोजन केले होते.

या कार्यक्रमाची महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार देवेंद्र कुऱ्हे यांनी तालुक्यातील गावात प्रत्येक गरजू व्यक्तीला महसूल विभागाशी असलेल्या सेवा तत्परतेने मिळाव्यात, तहसील कार्यालयात कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी चकरा मारण्याची वेळ येवू नये या उद्देशाने अभियानाचे आयोजन करण्यात आले असल्याचे उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.

या शिबिरात जातेगाव महसूल मंडलातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला असता, या शिबिरात  प्रलंबित फेरफार, ७/१२ उतार्यातील चुकांची दुरुस्ती, डिजीटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८ अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र, अकृषिक (N A) तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा,नवीन सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजुर करणे. 

शालेय विद्यार्थ्यांसाठी लागणारे दाखले वाटप,तुकडे बंदी कायद्याच्या उल्लंघन झालेल्या प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, खरेदी नोंद, हक्क सोड नोंद,अ.पा.क.नोंद,अँग्री स्टॅक आणि पी.एम. किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी - जास्त, पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करुन, तक्रार निवारण तसेच महसूल विभागाच्या योजनांचा लाभ देण्यात आला.

 निवासी नायब तहसीलदार देवेंद्र कुऱ्हे व रविंद्र महाडिक, सं. गां.यो.अव्वल कारकून योगेश पाटील, मंडळ अधिकारी आर. डी‌. चौधरी, कपिल मुलेपवार, ग्रामसीमाशुल्क अधिकारी दिनेश परदेशी, ग्राम महसूल अधिकारी जयेश मलदोडे,, प्रियंका गाडेकर, ग्रामविकास अधिकारी गोपाळ चौधरी तसेच भूमी महसूल, कृषी व इतर विभागांच्या विविध पंधरा हून अधिक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. 

अभिलेख चे उपअधीक्षक अल्पेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने परिक्षण भूमापक योगिता नागरे, विक्रम कायस्थ, आनंद मोरे, भुकरमापक बाबासाहेब बनसोडे आदी उपस्थित होते. तसेच कार्यक्रम प्रसंगी येथील सरपंच शांता ताई पवार, उपसरपंच पंढरीनाथ वर्पे, रफिक पठाण, बंडू पाटील, विजय पाटील, रामदास पाटील, संदीप पवार, बाळासाहेब लाठे,सुभाष पवार,गुलाब पाटील, संदीप सूर्यवंशी, राजू शेख, पतिंग चव्हाण, आदींसह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, परिसरातील ग्रामपंचायत अधिकारी अधिकारी, सरपंच, सदस्य, सर्व क्षेत्रांतील कर्मचारी, परिसरातील सर्व पोलिस पाटील, आशा व अंगणवाडी सेविका, शेतकरी, दिव्यांग आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments