चांदेश्वरी घाटात रस्त्याच्या झालेल्या दूरदशे मुळे ट्रकच्या चालकाच्या प्रसंग अनवधानाने टळला मोठा अनर्थ

 Bay- team aavaj marathi 

दि १३...

नांदगाव तालुक्यातील कासारी पासून जातेगाव बोलठाण कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या चांदेश्वरी या अवघड वळणाच्या घाटात गुरुवारी पहाटे च्या सुमारास चढाईच्या ठिकाणी तमिळनाडू राज्यातील ट्रक गाडीच्या इंजिन ने दम तोडल्याने मागे आल्याने चालकाच्या प्रसंग अनवधानाने मोठा अपघात होता होता टळला.

सविस्तर वृत्त असे की, कन्नड तालुक्यातील औट्राम घाट हा गेल्या वर्षभरापूर्वी छत्रपती संभाजी महाराज नगरच्या खंडपीठाने अवजड वाहने वाहतूकीसाठी बंद केल्यापासून दक्षिण उत्तर राज्यात होणारी मालवाहतूक व खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या टुरिस्ट बसेस आणि इतर वाहतूक ही मोठ्या प्रमाणात कासारी -जातेगाव-बोलठाण- शिउरबंगला या मार्गाने होत आहे. या मार्गावर कासारी पासून दोन किलोमीटर अंतरावर जातेगाव च्या दिशेने चांदेश्वरी हा अवघड वळणाचा व मोठ्या प्रमाणात चढा असलेला घाट आहे . गेल्या वर्षभरापूर्वी पासून औट्राम घाट अवजड वाहनांसाठी बंद केल्यापासून कासारी पासून खारीखामगाव च्या धरणापर्यंत सुमारे २५ किलोमीटर रस्त्यावरुन अतिरिक्त वाहनांची वर्दळ सुरु झाल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

रस्ता कोठे व खड्डा कोठे हे समजे अवघड झाले आहे. घाटात देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडल्याने या रस्त्याने वाहने चालविणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. त्यामुळे दररोज या घाटात तसेच या रस्त्यावर २५ किलोमीटर च्या अंतरात काही ना काही तरी कारणांमुळे ब्रेक डाऊन झाले आहे.

आज गुरुवारी तमिळनाडू राज्यातील TN.52-AE-6251 हि गुजरात राज्यातील सुरत येथून माल घेऊन कर्नाटक मध्ये जात असताना घाटातील अवघड वळणाच्या पुढे असलेल्या चढ्याच्या ठिकाणी रस्त्यावर असलेले खड्डे चुकवीतांना गाडीच्या इंजिन ची ताकद कमी पडल्याने चालकाच्या प्रसंग अनवधानाने बाजूला असलेल्या शंभर फूट खोल दरीमध्ये जाण्यापासून वाचली. दुपारी एक वाजता मनमाड येथून दोन क्रेन बोलवून सदरची गाडी बाजूला करण्यात आली. तोपर्यंत ३० फुट लांब असलेली गाडी रस्त्यावर आडवी झाल्याने दुपारी चार वाजेपर्यंत घाटात अवघड वळणाच्या ठिकाणी इतर वाहनधारकांना मोठी कसरत करुन आपली वाहने काढावी लागली. 




Post a Comment

0 Comments