Bay- team aavaj marathi 

 दि.३०..... 

जातेगाव येथील अंगणवाडी क्रमांक दोनच्या अंगणवाडी सेविका श्रीमती आशाताई सुभाष लोहारकर ह्या दि ३० एप्रिल रोजी सेवा निवृत्त झाल्या. यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी अंगणवाडी क्रमांक दोन येथे एकाच ठिकाणी ३७ वर्ष दिली. यावेळी वसंत नगर आणि चंदणपूरी येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी श्रीमती आशाताई लोहारकर यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान केला आणि त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आशाताई लोहारकर 


ग्रामपालिकेच्या वतीने सत्कार करताना सरपंच सौ शांताताई पवार व पदाधिकारी 

याप्रसंगी बोलताना श्रीमती लोहरकर मनोगत व्यक्त करताना ३७ वर्ष प्रदिर्घ सेवा देताना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडून खुप काही शिकायला मिळाले. त्यांच्या कडून कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. त्याचप्रमाणे गावातील स्तनदा माता, गरोदर महिला किशोर वयीन मुली त्यांचे वेगवेगळ्या समस्या इत्यादी अनुभव मिळाले. 

तसेच दररोज अंगणवाडीतील लहान लहान मुलांमध्ये वेळ कसा जात होता ते समजून येत नव्हते. मी ज्या अंगणवाडी मध्ये सेविका म्हणून काम करत होते, त्या वेळी विद्यार्थी असलेले येथील मुलें देशसेवेसाठी सैन्य दलात तसेच पोलिस दलात चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे इतरही विविध शासकीय खात्यात आणि विविध ठिकाणी खाजगी चांगल्या पदांवर कार्यरत आहेत.ते केव्हाही आपल्या गावी आल्यानंतर भेट झाली तर आवर्जून विचारपूस करत होते. 

त्यामुळे मी जी काही सेवा दिली तीचे फळ चांगले मिळाल्याचा आनंद होत होता. मला कामाची खूप उत्सुकता होती, माझ्या तब्येतीमुळे मला चालण्याचा खूप त्रास होत होता. परंतु मला नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी खूप सहकार्य केले. असे मनोगत व्यक्त करताना त्यांचे डोळे पाणावले होते.याप्रसंगी परिसरातील महिला तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.