आदिवासी युवकाचा जुन्या वादाची कुरापत काढून हत्या, ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

 Bay- team aavaj marathi 

दि.२६......

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील रेवणनाथ देविदास पवार (वय २३) याचा त्याच्याच मित्राने एक महिन्या- -पूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून दगडाने ठेचून जिवे ठार मारल्याची घटना सोमवार दि.२० रोजी घडली. मयत रेवणनाथ हा आदिवासी भिल्ल समाजाचा असल्याने आरोपीवर ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल.

सविस्तर वृत्त असे की, जातेगाव येथील रेवणनाथ देविदास पवार (वय २३) याचा त्याच्याच मित्र दादा सुरुपचंद निकम रा.लोढरा(नांदगाव) याने दगडाने ठेचून व इतर हत्याराने जिवे ठार मारुन मयताचे शव पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या परधाडी घाटातील म्हसोबा देवस्थान जवळ एका पोत्यात भरून फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. 

आपला मुलगा कोठे गेला म्हणून त्याचे वडील देविदास विश्राम पवार आणि भाऊ अरुण पवार यांनी शोधाशोध सुरु करुन पोलिस ठाण्यात तशी तक्रार दाखल केली होती.अशातच मयत रेवणनाथ पवार हा घटनेतील आरोपी दादा सुरुपचंद निकम याच्यासोबत जातेगाव परिसरात व नंतर परधाडी घाटात आढळून आले असल्याची माहिती काही नागरिकांनी मयताच्या परिवारातील सदस्यांना दिली होती. 

त्यावरून शनिवार दि.२५ रोजी परधाडी घाटात म्हसोबा देवस्थान जवळ एक तोंड बांधलेल्या पोते असुन त्यातून दुर्गंधी येत असल्याची माहिती बोलठाण पोलिस चौकीत एका इसमाने दिल्यानंतर मनमाड चे उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड आणि नांदगाव चे पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भास्कर बस्ते आणि पोलिस नाईक परमेश्वर श्रीखंडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने रेवणनाथ याची मिसींग कंप्लेंट दाखल असल्याने त्याच्या परिवारातील सदस्यांना बोलविले असता मयत व्यक्ती ही रेवणनाथ पवार असल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी या घटनेतील आरोपीला ताब्यात घेवून पोलिस खाक्या दाखवताच आरोपी दादा सुरुपचंद निकम यानी स्वतः केले असल्याचे कबूल केले.

 मयत रेवणनाथ पवार हा आदिवासी भिल्ल समाजाचा असल्याने भारतीय न्याय संहिता कलम - १०३ अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम १९८९ चे कलम ३(२) (v) ॲट्रॉसिटी कायदा) प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर १६५/२०२६ नुसार नोंद करण्यात आला असून वरील घटनेला सहा दिवस झाले असल्याने व मयताचे शव कूझल्याने नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले असल्याने दि. २६ रोजी रविवारी सायंकाळी उशीरा मयत रेवणनाथ पवार याच्या मृतदेहावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments