Bay- team aavaj marathi
K. k. महाले पत्रकार जातेगाव नांदगाव (नाशिक)
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी.जयंती निमित्त सकाळी ९ वाजता येथील ग्रामपंचायत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून व बौद्ध वंदना घेवून करण्यात आली. जयंतीच्या निमित्ताने पुतळ्याच्या सभोवतालचा परिसरास रंगीबेरंगी फुलांनी व रोषणाई करुन सजावट करण्यात आली होती.
सायंकाळी सहा वाजता येथून डिजे वाद्यावर भीम गीतांच्या तालासुरात आकर्षक रोषणाई केलेल्या रथामध्ये डॉ. आंबेडकरांचा पुतळा विराजमान करुन रंगीबेरंगी आतिषबाजी करत मोठ्या थाटामाटात ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब लाठे,अप्पा त्रिभुवन, राजू लाठे, शंकर लाठे, अशोक लाठे व जेष्ठ समाज बांधवांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समिती अध्यक्ष प्रमोद लाठे,भीमराव निकम,उमेश शिंदे आणि तरुण कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी येथील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ.आंबेडकरांबाबत मनोगत व्यक्त केले.
सालाबादप्रमाणे मिरवणूक आंबेडकर नगर येथे गेल्या नंतर सर्व अनुयायांनी सपत्नीक औक्षण करून पूजन करून दर्शन घेतले. यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले इत्यादी महापुरुषांचा जय जयकार करत मिरवणूक धिम्या गतीने गावातील प्रमुख मार्गावरून जसजशी जात होती.तसे ठिक ठिकाणी नागरिकांनी डॉ.आंबेडकरांचे पुजन केले.
मिरवणुकीत जेष्ठ नागरिक, तरुण आणि महिला सहभागी झाल्या होत्या.गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणुकीची सांगता पुन्हा डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर बुद्ध वंदना घेऊन मिरवणूकीची सांगता करण्यात आली.
0 Comments