यातनामय रूढी प्रथा परंपरेच्या अमानवी अभावग्रस्त पशुतुल्य जिवन जगणाऱ्या समूहास भारतीय संविधानाने पहिल्यांदा माणूसपण बहाल केल्या ने वंचितांची प्रगती झाल्या चे प्रतिपादन प्रख्यात आंबेडकरी वादी विचारवंत प्रो.डॉ. अनिल काळबांडे यांनी केले ते कारखेड फाटा येथे आयोजित १० सम्राट अशोक बौद्ध धम्म परिषदेत ' संविधान ' या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.या धम्म परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे तर स्वागत अध्यक्ष मिलिंद धुळे हे होते.
आयोजित सत्कार सोहळ्याचे आयोजक थोर विचारवंत प्रोफेसर डॉ.भास्कर दवणे यांनी 'पृष्पाई सेवा प्रतिष्ठान च्या वतीने आंबेडकरी मिशनचे प्रमुख दिपक कदम (नांदेड ) यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षण रत्न तर प्रो डॉ अनिल काळबांडे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्य रत्न ' तर जेष्ठ विधी तज्ञ अँड. डि .एफ हरदडकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिवन गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या वेळी दीपक कदम मार्गदर्शन करतांना म्हणाले, शिवराय व्हायचे असेल तर मातेला अगोदर जिजाऊ होण्याचे स्वप्न पाहावे लागतील तरच शिवराय जन्माला येतील आपणास मोठी स्वप्न पाहून त्या प्रमाणे आचरण करावे लागेल तर डॉ भास्कर दवणे यांनी ,केवळ शिक्षणानेच आपला विकास होऊ शकते तेव्हा शिक्षणाला महत्व द्या . अँड हरडफकर यांनी, बौध्द धम्मात आचरणाला महत्व आहे शुद्ध व्हा बुद्ध व्हा ला संदेश या वेळी दिला . सत्काराला व प्रमुख मार्गर्शन करतांना डॉ काळबांडे यांनी, संविधान येण्यापूर्वी आपली काय अवस्था होती आणि संविधान असल्याने आपली काय प्रगती झाली याचा लेखा जोखा मांडून संविधानाचा जागर केला.
या धम्म परिषदेचे आयोजक सुधाकर कांबळे यांनी, धम्म परिषदेच्या आयोजनाची भूमीका सांगून मानवी मूल्य समाजात पेरण्याचा आमचा उद्देश असल्याचे आपल्या प्रास्ताविकेत तून सांगीतले . या वेळी प्रमुख अतिथी म्हणून समाजसेविका पुजा अंबादास धुळे, प्रणिता कांबळे, नगरसेवक विरेंद्र खंदारे, सह मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधाकर कवडे, प्रदिप कांबळे यांनी तर आभार शाहीर अनिल आठवले यांनी मानले. या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन सुधाकर कांबळे संयोजन सुनील कवडे अध्यक्ष धोंडबा विनयते सचिव चंपतराव विनकरे, भीमराव काळबांडे, सखाराम सावते,अनिल आठवले, सुरेश दवणे,संभाजी कांबळे,दीपक वाठोरे सह सम्राट अशोक बौद्ध धम्म परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते.
0 Comments