नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून उत्तरेस सह्याद्री पर्वत रांगेतील श्री पिनाकेश्वर महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला वन विभागाच्या हद्दीत येथील सेवा निवृत्त सैनिक व सध्या नाशिक पोलिस दलात कार्यरत असलेले संजय जोनवाल यांनी स्वखर्चाने शिसव, फापडा, कांचन, अर्जुनसातडा, कडूनिंब,करंज इत्यादी प्रजातीचे सुमारे सातशे वृक्षांची लागवड केली.
त्यासाठी त्यांना सामाजिक वनीकरण विभाग नांदगाव व स्थानिक मित्र मंडळी आणि नातेवाईक यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे जोनवाल यांनी सांगितले.
वृक्ष लागवड करणे सोपे जावे यासाठी जेसीबी मशीन च्या सहाय्याने खड्डे खोदून वृक्षांची लागवड करण्यात आली. यानंतर उपस्थितांना महादेव मंदिराच्या प्रांगणात दाळ बट्टी चे सुग्रास भोजन देण्यात आले. पोलिस कॉन्स्टेबल संजय जोनवाल यांच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याप्रसंगी वनविभागाचे श्री हेमंत कोकाटे, वनरक्षक श्री.नवनाथ बिन्नर, श्री. ललित कुमार बोरसे, श्री चारुदत्त लहाने, श्री. समर्थ गाढवे, श्री संतोष गुरुकुले, श्री विकास बहिरम व श्री गोपाळ चौधरी तसेच राजेंद्र जोनवाल, विजय जोनवाल माजी सैनिक कृष्णाजी शिंदे, व मित्र मंडळींचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितले त्यांनी वृक्षारोपण करण्याच्या सामाजिक बांधिलकी ची दखल घेऊन त्यांचा देवस्थान ट्रस्ट च्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
0 Comments