समृद्धी सहकारी बँक नांदगाव च्या बोलठाण शाखेचे उद्घाटन आ. सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते संपन्न

 Bay- team aavaj marathi 

 नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील व्यापार पेठ म्हणून ओळख असलेल्या बोलठाण येथे दि २४ रोजी समृद्धी सहकारी बँक नांदगाव च्या बोलठाण शाखेचे उद्घाटन आ. सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आ. सुहास अण्णा कांदे यांचे ढोल ताशाच्या गजरात आतीषबाजी करत भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधिवत सत्यनारायण पूजा संपन्न झाली. 

यावेळी मनोगत व्यक्त करताना आ. सुहास आण्णा कांदे म्हणाले की, बोलठाण तसेच घाटमाथा परिसरातील सर्व सामान्य जनता तसेच प्रत्येक लहान मोठ्या व्यापारी बांधवांना उत्तम सुविधा, तत्काळ सेवा देण्याच्या उद्देश्याने समृद्धी बँक काम करेल असे आश्वासित केले. तसेच बोलताना आ. सुहास अण्णा यांनी कासारी पासून तर बोलठाण- रोहिला गावापर्यंत च्या रस्त्यासाठी १२ कोटी रुपये पैसे मंजूर झाले असून लवकरच या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होईल असे जाहीर केले.

तर बॅंकेच्या अध्यक्षा सौ अंजुमताई कांदे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, समृद्धी बँक असो, दूध संघ असो किंवा महिला उद्योग समूह,  असे सर्व उपक्रम फक्त आणि फक्त मतदारसंघाच्या माता भगिनी सामान्य नागरिक व्यापारी बांधव शेतकरी बांधव यांच्या साठीच राबविण्याचा एकमेव उद्देश असून एकच ध्यास तालुक्याचा सर्वांगीण विकास हा मानस असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून म्हटले.

यावेळी निमंत्रक म्हणून बँकेच्या अध्यक्षा सौ. अंजुमताई सुहास कांदे सर्व महिला संचालक मंडळ बापूसाहेब कवडे, राजेंद्र नहार उपस्थित होते. बाजार समितीचे माजी सभापती बंडू पाटील, उपसभापती दत्तात्रय पा. निकम, माजी उपसभापती अनिल सोनवणे, रफिक पठाण, गुलाब पाटील,भरत पाटील, मारुती सोनवणे, भाऊसाहेब सुर्यवंशी पंचकौशितील शिवसेनेचे पदाधिकारी, सरपंच विकास सोसायटी चे अध्यक्ष संचालक तालुक्यातील सर्व व्यापारी बांधव, नेते मंडळी शिवसेना पदाधिकारी, नांदगाव मनमाड समृद्धी बँकेचे सर्व कर्मचारी, संचालक मंडळ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येथील व्यापारी गोकुळ कोठारी, चंद्रकांत जाधव अमित नहार अनिल तात्या रिंढे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.


उपस्थितांचे आभार येथील शिवसेना नेते अनिल तात्या रिंढे  व्यक्त केले, ते म्हणाले की नांदगाव पेक्षा ही बोलठाण ही मोठी व्यापारी बाजारपेठ असूनही उत्तम बँक व्यवस्था नसल्याने मोठ्या व्यापारी बांधवांना असुविधा होत होती. वेळेवर पैसे मिळत नव्ह्ते, उत्तम सुविधा मिळत नव्हती अशा परिस्थितीत आता समृद्धी बँकेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना नक्कीच मोठा फायदा होणार असून याबद्दल व्यापाऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले.


Post a Comment

0 Comments