पत्रकार जगन्नाथ (नाना) पाटील न्यायडोंगरी नांदगाव नाशिक
मुंबई आग्रा रस्त्यावरील चांदवड येथे टोल नाक्यावरील व्यवस्थापन बदलल्याने नियमही बदलले असा अजब प्रकार चांदवड टोलनाक्यावर घडत असून त्यामुळे नांदगाव तालुक्यातील असंख्य वाहनधारकांनी तक्रारी केल्या आहेत. नागरिकांना अतिरिक्त शुल्काचा भुर्दंड न करता प्रचलित पद्धतीने मासिक शुल्क आकारून सवलतीच्या दरात प्रवास करता यावा ह्या करिता टोल प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने नांदगाव तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी टोल प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केली आहे.
0 Comments