बंब बंब भोले च्या गजरात पिनाकेश्वराचे ८० हजार पेक्षा अधिक भाविकांनी घेतले दर्शन होमगार्ड कर्मचार्यांनी कर्तव्य सोडून बाजूला बसून केली अरेरावी, रहदारी ठप्प

Bay- team aavaj marathi 

 दि २४…... 

जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून उत्तरेस सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगराच्या शिखरावर नाशिक, जळगाव आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्याच्या वन विभागाच्या हद्दीवर असलेल्या जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे जातेगांव चंदनपुरी येथील सर्वात मोठे श्री पिनाकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी दि.२८ रोजी पवित्र श्रावणी सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ८० हजार भाविकांनी हर हर महादेव, सद्गुगुरू जनार्दन स्वामी महाराज की जय, गंगागिरीजी महाराज की जय, बंब बंब भोले च्या गजरात दर्शन घेतले.रात्री १२ वाजे पासून ते सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत मिळेल त्या वाहनाने आले होते.
मंदिरात दर्शन घेताना भाविक 

हे देवस्थान पुरातन असून ह्या देवस्थानाचा काशी खंड या पवित्र धार्मिक ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो, नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेल्या महादेवाच्या मंदिरानंतर जिल्ह्यातील दुसऱ्या नंबरचे महादेवाचे देवस्थान म्हणून ओळखले जाणारे श्री पिनाकेश्वर महादेवाचे देवस्थान आहे. या मंदिराचा सन ६० च्या दशकात संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी पंचक्रोशीतील नागरिकांच्या सहकार्याने हेमाडपंथी पद्धतीने जीर्णोद्धार करून मंदिराच्या आतील सर्व देवी देवतांच्या मूर्ती श्रीक्षेत्र काशी येथून आणून प्राणप्रतिष्ठा केली होती त्यानंतर ब्रह्मचारी गंगानंद महाराज यांनी मंदिरासमोरील सभा मंडपाचे काम त्याच प्रमाणे गोशाळा, भक्त निवास इत्यादी काम पूर्ण केले होते. 
दर्शनबारीत महिला व पुरुषांची स्वतंत्र रांग

येथे दर्शनासाठी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासनाने डोंगराच्या पायथ्याशी सर्व वाहनांना डोंगरावर नेण्यासाठी बंदी घातल्याने भाविकांना अडीच किलोमीटर पाई चालत जावून देवाचे दर्शन घेतले असावे. असे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अर्जुन (बंडू) पाटील, सचिव बाबासाहेब चव्हाण, यांनी सांगितले यावेळी उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, खजिनदार रामदास पाटील, विश्वस्त ज्ञानदेव चव्हाण, शिवाजी वर्पे, शरद पवार, गोपाळ पवार हे उपस्थित होते.
मंदिर परिसरात झालेली भाविकांची गर्दी 

बंदोबस्तावर तैनात पोलिस कर्मचारी 

पोलिस निरीक्षक यशवंत सोळसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उप पोलीस निरीक्षक सतीश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भास्कर बस्ते, पोलिस शिपाई परमेश्वर श्रीखंडे व पुरुष व महिला पोलिस शिपाई यांनी चोख बंदोबस्त बजाविल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

होमगार्ड कर्मचार्यांनी कर्तव्य सोडून बाजूला बसून केली अरेरावी, रहदारी ठप्प 

डोंगराच्या पायथ्याशी दुचाकी चार चाकी ट्रॅक्टर खाजगी प्रवासी बस बोरसे वस्ती आणि चंदणपूरी मार्गे येणार्या दोन्ही रस्त्यावर बेशिस्तपणे चार किलोमीटर उभे केल्याने दुपारी दोन तास वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. याठिकाणी उपस्थित रोजंदारी होमगार्ड पथकाचे सुमारे १० पेक्षा अधिक कर्मचारी बघ्याची भूमिका घेत बाजूला बसलेले होते. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या पत्रकार व भाविकांना त्यांनी उर्मट भाषा वापरत अरेरावी केली. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात असून काही काळ गोंधळ निर्माण झाला होता,स्थानीक पोलिस हवालदार भास्कर बस्ते यांनी मध्यस्थी केल्यानंतर परिस्थिती निवळली.

Post a Comment

0 Comments