सहा महिन्यांपूर्वी वादळी पावसात सौर प्लेटच्या झालेल्या नुकसानीची अद्याप ही नुकसान भरपाई नाही.

 Bay- team aavaj marathi 

दि ९.....नांदगाव तालुक्यातील जातेगाव आणि परिसरात झालेल्या वादळी पावसात शेतातील सौर ऊर्जेच्या प्लेट वादळाने उन्मळून उलटून पडल्याने शेतकर्यास अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याने शेतकर्यास आर्थिक भुर्दंड बसला आहे. 

सविस्तर वृत्त असे की येथील शेतकरी गणेश रामभाऊ गायकवाड यांच्या शेतात इकोझेन या कंपनीचे गट नंबर ७४०/२ मध्ये ५ एच पी चे ९ प्लेट चा संच असलेला एप्रिल महिन्याच्या शेवटी विहिरीवर मोटार पंप आणि सौर ऊर्जेच्या प्लेट बसविल्या होत्या.

परंतु एका महिन्यातच दि.१३ जुन रोजी झालेल्या वादळी पावसात शेतातील सौर ऊर्जेच्या प्लेट वादळाने उन्मळून उलटून पडल्या त्यात ९ पैकी सात प्लेट निकामी झाल्या. या झालेल्या नुकसानीचा पंचनामा येथील तलाठी जयेश मलदोडे आणि कृषी सहायक यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही साठी पाठविला होता. तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी कंपनीचा टोल फ्री क्रमांक 8109536458 यावर झालेल्या सौरप्लेटची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी गणेश गायकवाड यांनी वारंवार इकोझेन या कंपनीने फोन करून तक्रार दाखल केली.

त्याचप्रमाणे या कंपनीचे ठेकेदार, कर्मचारी यांच्याकडे चौकशी करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी लागणारी अपेक्षित कागदपत्रे सादर केले सहा महिने उलटून गेले. परंतु या शेतकर्यास महसूल विभाग, कृषी विभाग, तसेच ज्या सौर ऊर्जा कंपनी चे ठेकेदार यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असून झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनी देते,यात आमचा काही संबंध नाही असे सांगून हात वर केले जात असल्याने गणेश गायकवाड या शेतकर्यास सौर ऊर्जाच्या पंपापासून फायदा तर झालाच नाही, परंतु आर्थिक भुर्दंड बसला असून नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत आहे .

Post a Comment

0 Comments