ही कसली कर्जमाफी योजना ही तर कर्ज वसुली वसुली योजना - भरत पाटील

Bay- team aavaj marathi 

13 Jun 

नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली असून सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा करुन या योजनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करताना ही कर्ज माफी योजना नसून ही सरकारने कर्ज वसुली योजना आनली असल्याचे जातेगाव येथील भरत पाटील यांनी म्हटले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना भरत पाटील म्हणाले की, सरकारने केलेली कर्जमाफी ही 100% फसवी आणि बँकांच्या हिताची करण्यात आलेली आहे, यात शेतकऱ्यांची कुठलीही दयामाया करण्यात आलेली नाही.अभ्यास करण्याच्या नावाखाली फडणवीस सरकारने प्रत्येक क्षेत्रात शेतकऱ्यांना भरडला आहे. रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढविल्या त्या तुलनेत शेतीमालाचे भाव अत्यंत कमी आहे. व्यापार नीतीचा कुठल्याही प्रकारचा दृष्टीकोन सरकारकडे दिसून येत नाही. प्रत्येक निवडणुकीत मोठमोठे आश्वासन देत शेतकऱ्यांच्या नावाने बोंबा मारून मतदान मिळवायचे हा एकमेव भामटा धंदा चालू आहे. २०१९ मध्ये कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची पण ५०००० रू ची अट रद्द करून सरसकट दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करावे अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

याबाबत अधिक बोलताना शेतकरी बांधव स्वाभिमानी असून सन २०१९ ते २५/२६ वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांना कोरोना सारखी महामारी, अवकाळी पाऊस, इत्यादी आसमानी व सुलतानी संकटामुळे शेतमालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी संकटात आहे.  त्यामुळे सरकारने निवडणूक कालावधीत सरसकट कर्ज माफी चे दिलेले आश्वासनांची पूर्तता करुन दिलेले आश्वासन पूर्ण करावे. सरकारने केलेली ही कर्जमाफी फसवी असून त्याचा पुनर्विचार करावा तसेच जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.

अटी शर्ती च्या या कर्ज माफी योजनेत गावातील फक्त आणि फक्त दहा शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो असे सांगताना सरकारने कर्ज माफी योजनेचे खुप मोठे गाजर दाखवून कर्ज वसुली योजना आनली असल्याचे सांगताना जाहीर निषेध जाहिर निषेध व्यक्त केला.

 

Post a Comment

0 Comments