जातेगाव येथे हिंदू खाटीक समाजभूषण संतुजी लाड यांची जयंती उत्साहात साजरी

 Bay-team aavaj marathi 

जातेगाव येथे महामानव सत्यशोधक समाजाचे अग्रदूत हिंदू खाटीक समाजभूषण डॉक्टर संतुजी रामजी लाड यांची 185 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटना नवी दिल्ली युवा प्रकोष्ठ पूर्व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अमोल खिराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. रावसाहेब  खिराडकर यांचे नेतृत्वाखाली उत्सव समिती स्थापन आली होती.

उत्सव समिती अध्यक्ष संदीप खिरडकर उपाध्यक्ष बाळु क्षिरसागर कोषाध्यक्ष ध्रुवबाळ खिरडकर, सचिव प्रशांत खिरडकर, खजिनदार, सुनिल खिरडकर सहसचिव अवचित खिरडकर , तसेच ग्रामपंचायत ग्रामपालिका कार्यालय जातेगाव येथे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व गावकरी तसेच हिंदू खाटीक समाज मोठ्या संख्येने उपस्थित सकाळी ग्रामपंचायत कार्यालय येथे नऊ वाजता संतुजी लाड यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली व गावामध्ये विश्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, संत रोहिदास, महात्मा ज्योतिराव फुले, अण्णाभाऊ साठे, एकलव्य यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आले त्यानंतर हिंदू खाटीक ग्रामदैवत मुंजोबा यांचे पूजन आमदार श्री .सुहास आण्णा कांदे यांचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे,एन के राठोड, आबा नाईक नांदगाव सरपंच.सौ.शांताबाई चांगदेव पवार सर्व ग्रामपंचायत सदस्य शिवसेना तालुकाप्रमुख गुलाबराव चव्हाण, शिवाजी गायकवाड गावातील ज्येष्ठ नागरिक यांनी उद्घाटन केले. 

 त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता डॉ. संतुजी रामजी लाड यांच्या प्रतिमेची गावात डीजेच्या तालात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक झाल्यानंतर आलेल्या प्रमुख पाहुणे सरपंच सौ. शांताबाई पवार, सौ. कांताबाई खिरडकर श्री रामदास चव्हाण, संदीप पवार, श्री बाळू लाठे,श्री राजु शेख, श्री.संतोष गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विजय माधव चव्हाण शिवसेना तालुका प्रमुख गुलाब चव्हाण, प्रहार जनशक्ती पक्ष संदीप सूर्यवंशी, निर्भय महाराष्ट्र पार्टी चंद्रभान घोडके, पत्रकार ईश्वर जाधव, तसेच बाहेर गावावरून आलेले पाहुणे हिंदू खाटीक समाज बांधव औराळा,रुईखेडा, कोपरगाव, आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

डॉक्टर संतुजी लाड यांच्या जिवन कार्यावर राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विजय चव्हाण, संदिप भाऊ पवार, गुलाब चव्हाण, ईश्वर संदीप खिरडकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व सकल हिंदू खाटीक समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता सुग्रास भोजनाने झाली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री सोपान विश्वनाथ खिरडकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उत्सव समिती अध्यक्ष संदीप खिरडकर यांनी मानले.



Post a Comment

0 Comments