शंभर वर्षाची परंपरा असलेल्या हरीनाम सप्ताहाची शनि मंदिर येथे होणार पाडव्याच्या दिवशी शुभारंभ

 Bay- team aavaj marathi 

जगन (नाना) पाटील पत्रकार न्यायडोंगरी (नांदगाव)

नांदगाव तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान देशातील साडेतीन शनिपिठांपैकी पुर्ण पीठ असलेले श्रीक्षेत्र नस्तनपूर येथे सालाबादप्रमाणे गुढीपाडव्याचे पूर्व संध्येला १८मार्च रोजी अखंड हरिनाम एक दिवसीय एक्का पारायण सोहळा मोठ्या उत्साहात व आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. यंदाचे वर्षे हे या कार्यक्रमाचे शतक महोत्सवी वर्ष असून बरोबर शंभर वर्षांपूर्वी १९२६/२७ या साला मध्ये तत्कालीन धुरंदर व दूरदृष्टी असलेले या परिसरातील नेते वै.वेडूजी पांडुजी पाटील (न्यायडोंगरी) वै .रामचंद्र माधवराव पवार, वै .बाळा फकिरा गायकवाड (पारधाडी) वै . त्र्यंबक संपतराव सुर्वे ( चांदोरा) वै .राऊत बाबा (जळगाव खुर्द) वै.लालमण लक्ष्मण गरुड (पिंपरखेड) वै .शामराव दादाजी वेळसकर, वै .त्र्यंबकराव वाघ (पिंपरी हवेली) यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ती परंपरा आजही नित्य नियमाने अखंडीत चालू आहे. १५ फेब्रुवारी १९५४ रोजी श्री शनी मंदिर संस्थांनची स्थापना करून शासन दरबारी रीतसर नोंदणी करण्यात आली.

तत्कालीन विश्वस्त वै.कमलदशजी महाराज, वै.शिवराम वेडूजी पाटील, वै. राधाकृष्ण जमनादास बारी, वै. बंन्शीलाल गुलाबचंद नहार, वै.राघो लक्ष्मण पाटील, वै.भाऊराव लालमन गरुड, वै.सुखदेव तुकाराम गरुड, वै.माधव भंडारी,वै. त्र्यंबकराव सुर्वे, तुळशीराम सेठ कलंत्री आदींनी संस्थानच्या विकासाबरोबरच या एक्का पारायणाची परंपरा जनमानसात अधिक रुजविली.

सन १९९० चे दशकात या संस्थेच्या विश्वस्त पदाची व सर्व कारभाराची जबाबदारी तालुक्यातील अभ्यासू व दूरदृष्टचे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार ॲड.अनिलदादा आहेर यांच्या कडे सोपविण्यात आली . आणि "आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे" तद्वतच या संस्थान बाबत अनुभव येऊ लागले याच दरम्यान चे काळात माजी आ.अनिल दादा आहेर नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांच्या प्रयत्नांतून नस्तनपूर देवस्थानस शासन दरबारी तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला त्यामुळे शासनस्तरावरून काही प्रमाणात विकास निधी उपलब्ध होऊ लागला असतानाच नामदार श्री छगन भुजबळ यांच्या कडे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास खाते आले त्यांनी या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी १४ कोटी ५० लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला.

तेंव्हापासून या तीर्थक्षेत्राचा कायापालट होऊन आज हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील एक अग्रगण्य क्षेत्र म्हणून ओळखले जात आहे. विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून या तीर्थक्षेत्रास "ब "दर्जा प्राप्त झाल्याने विकास निधी उपलब्ध करून घेणे तसेच अनेक योजना राबविण्यात मोठ्या प्रमाणात वाव मिळाला आहे.

अशा या पावित्र्य तीर्थक्षेत्रावर शंभरावा अखंड हरिनाम एकदिवसीय एक्का पारायण सोहळा आज संपन्न होत असून या सोहळ्यासाठी नाशिक जिल्ह्याचे भुषण ह. भ. प. डॉ.रामकृष्णदास  महाराज लहवितकर हे गेल्या ५४ वर्षांपासून अखंडीत कीर्तन सेवा देत आहेत हे विशेष म्हणावे लागेल.हा शतक महोत्सवी सोहळा वैशिष्ट्यपूर्ण व यशस्वी करण्यासाठी विद्यमान विश्वस्त मंडळ,परिसरातील सर्व शनी भक्त विशेष परिश्रम घेत आहेत. आपणही सर्वांनी या भव्य दिव्य सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन शनी मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.




Post a Comment

0 Comments