गंगाधरी येथे अनोख्या पद्धतीने ध्वजारोहन

 Bay -team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगांव तालुक्यातील गंगाधरी येथे स्वातंञ्य- सेनानी डाॅ. भुतेकर यांच्या समाधीस्थळी नागरिकांनी स्वच्छता करुन त्या जागेवर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहन करुन त्यांचे स्मरण केले.डाॅ. भुतेकर यांच्या समाधी स्थळी राष्ट्रध्वज रोवून व  त्यांना मानवंदना दिली.

गंगाधरी येथे दि १५ रोजी सकाळी स्वातंत्र्य सैनिक डॉ. भुतेकर यांच्या समाधीस्थळ स्वच्छता अभियान राबविण्यात आले व राष्ट्रध्वज रोवुन त्यांना मानवंदना देण्यात आली, कारण होते गंगाधरी गावाचे मा. सरपंच व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष भगिरथ जेजुरकर 15आगष्ट. रोजी जि.प. शाळा गंगाधरी येथे ध्वजारोहण झाले त्यावेळी जेजुरकर यांनी आपल्या भाषणात ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक यांना आपल्या गावात थोर स्वातंत्र्यसेनानी डॉ.भुतेकर यांच्या वास्तव्याने भुमी पावन झाली आहे. ब्रिटिश साम्राज्य होते, त्यावेळी त्यांनी डॉ. भुतेकर यांना पकडून देण्याबद्दल मोठी बक्षिसे देण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यावेळी ते मुळचे सटाणा येथील रहिवाशी होते,  त्यावेळी ते नांदगांव गंगाधरी येथे भुमिगत राहिले होते, त्यांचे सहकारी गंगाधरीत येथील स्वर्गीय हरिश्चंद्र भागुजी सोनवणे हे सर्व आठवणी डोळ्यासमोर ठेवून  कधी कधी गावातील वेगवेगळ्या ठिकाणी व शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला किंवा ध्वजारोहण झाले की आपल्या भाषणात त्यांनी डॉ भुतेकर यांच्या जीवनावर ते आठवणीं ना ऊजवळा देत ते बोलत असताना अंगावर शहारे येत असत कारण त्यांनी सुध्दा ब्रिटीशांचा प्रचंड त्रास सहन केला होता. याबाबत उपस्थितांना माहिती दिली.

 त्यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाधरी गावचे माजी सरपंच भगिरथ जेजुरकर यांनी 2006मध्ये डॉ भुतेकर यांच्या समाधी स्थळ येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते, व अभिवादन करण्यात आले होते. असे भगिरथ जेजुरकर यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक आणि शिक्षक यांना आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. व आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने डॉ. भुतेकर यांच्या समाधी स्थळ आपण स्वतः व सर्व ग्रामस्थ व उपस्थित यांना आव्हान केले कि आपण सर्वजन डॉ भुतेकर यांच्या समाधी स्थळी जाऊन स्वच्छता करून राष्ट्रध्वजाचे पुजनकरुन वंदन केले. यावेळी जि,प. शाळेचे मुख्याध्यापक अहिरे,सरपंच विश्वजित जाधव, जेष्ठ नागरिक गोविंद जाधव , शाळेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश ईघे,बापु ईघे, किरण गांगुर्डे,सागर कळमकर, पत्रकार गणेश जाधव, महाजन पाहुणे, महाजन व ग्रामस्त आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments