उमरखेड येथे प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी भारत संचार निगम लिमिटेडच्या उमरखेड येथील कार्यालयात ध्वजारोहण झाले नसल्याचे निदर्शनास आले असून चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी माजी नगरसेवक संदीप ठाकरे यांनी पोलिसात तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्याने कार्यालयात खळबळ उडाली आहे. भारतीय प्रजासत्ताक दिन दरवर्षी देशात २६ जानेवारी रोजी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. या दिवशी प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालय,शाळा महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण करून राष्ट्राप्रती प्रेम व्यक्त केल्या जाते.
परंतु येथील भारत संचार निगम लिमिटेड ( बीएसएनएल ) च्या कार्यालयात सदर राष्ट्रीय कार्यक्रम घेण्यात आला नसल्याचे निदर्शनात आले आहे. असे तक्रारीत नमूद करू सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर कार्यवाही करण्याची मागणी माजी नगरसेवक संदीप गणपत ठाकरे यांनी पोलीस स्टेशन उमरखेड ला आज दिनांक ३० जानेवारी रोजी दिलेल्या तक्रारीवरून केली आहे. यावरून सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात असून एवढी मोठी चूक कशी होऊ शकते या बाबत चर्चेला उधाण आले आहे पोलिसात तक्रार दिल्याने यावर पोलीस चौकशी करून काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
0 Comments