नांदगाव येथे कविवर्य कुसुमाग्रजांना अभिवादन, विद्यालयात 'मराठी भाषा गौरव दिन' उत्साहात

Bay- team aavaj marathi 

शरद आहेर सर पत्रकार नांदगाव (नाशिक)

मराठी भाषेचे भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त 'मराठी भाषा गौरव दिन' मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या नांदगाव येथील विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी  मराठी भाषेचा वारसा जपण्याचा आणि तिचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला.

या निमित्त मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व उपस्थितांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आली. विद्यालयातील गीतमंच्याने "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..." या गीताचे सादरीकरण केले. तसेच विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे सादरीकरण केले. तसेच 'मराठी भाषेचे महत्त्व' या विषयावर ओघवती भाषणे दिली. 

 यावेळी मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापिका काळे म्हणाल्या की, "मराठी ही केवळ आपली भाषा नसून ती आपली संस्कृती आणि ओळख आहे. दैनंदिन जीवनात मराठीचा जास्तीत जास्त वापर करणे आणि वाचन संस्कृती जोपासणे हीच कुसुमाग्रजांना खरी श्रद्धांजली ठरेल." या सोहळ्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख शरद आहेर यांनी केले.

Post a Comment

0 Comments