मराठा विद्या प्रसारक समाजाचे होरायझन अकॅडमी नांदगाव शाळेत २७ फेब्रुवारी मराठी भाषेचे थोर साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते,कवी वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस यानिमित्ताने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या श्रीमती पूनम डी. मढे या होत्या. त्यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचे महत्व तिची समृद्ध परंपरा आणि विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अभिमानाने वापर करावा असे प्रतिपादन केले.
मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून संस्कृती ओळखणारी भाषा आहे. असे त्यांनी सांगितले. शालेय शिक्षिका अलका बिन्नर यांनी कुसुमाग्रज यांच्या बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच कुसुमाग्रज यांच्या कवितेंच वाचन केले. तसेच साहित्य बद्दल सांगितले. यावेळी ओम मोरे, मुक्ता तुसे या विद्यार्थ्यांनी पोवाडा गायन केले इयत्ता चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांनी कविता भाषणे,गीते सादर करून उपस्थितांचे मन जिकंले.या कार्यक्रमाप्रसंगी शालेय,शिक्षक,शिक्षक,शिक्षकेतर, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती. शरयू आहेर यांनी केले.
0 Comments