या शहरात सक्षम अधिकारी नसल्याने स्वच्छता कर्मचारी झाले अधिकारी, भिकारी करतात साफसफाई

 Bay- team aavaj marathi 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई च्या पायथ्याशी असलेल्या इगतपुरी नगर परिषदेत सात वर्षांपासून आरोग्य निरीक्षक पदच रिक्त असल्याने शहरातील स्वच्छतेचे बारा वाजले आहे. त्यामुळे घनकचरा व आरोग्य सुविधा धोक्यात आली आहे. गटारी मैला आणि कचऱ्याने तुडुंब भरल्या असून, ठिकठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. सर्वांत धक्कादायक म्हणजे शहरातील काही भागांमध्ये भटके, भिकारी यांना काही रक्कम देत सफाई कर्मचारी स्वतः स्वच्छता न करता शहरात कडक कपडे घालून टंगळमंगळ करतात अशी नागरिकांची तक्रार आहे. दरम्यान, याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

शहरात तसेच अनेक भागात वस्तीमध्ये लहान मोठ्या गटारींमध्ये व नाल्यांमध्ये, मैला साचल्याने तुडुंब भरल्याने सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया व्यवस्थीत होत नसल्याने शहरात अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे शहरात साथीच्या व संसर्गजन्य आजारांनी डोकें वर काढले आहे.  शहरात बाजारपेठेतील हॉटेल व व्यवसायीक इमारतींना शौचालयाच्या टाक्या नसल्याने मलमुत्र सांडपाण्याच्या गटारीत विसर्जन होत असल्याने, त्याची प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही नगरपरिषदेची आहे मात्र सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी नगरपरिषदेकडे निरिक्षक नसल्याने नागरिकांचे आरोग्य रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे.

नगर परिषदेचे अधिकृत सफाई कर्मचारी शहरात अनेक भागात स्वतः सफाईचे काम न करता भिकाऱ्यांना काही मोजके पैसे देऊन त्यांच्याकडून शहरातील ठराविक ठिकाणचा भाग स्वच्छ करून घेत आपलं 'कर्तव्य बजावताना दिसत आहेत अनेक सफाई कर्मचारी नगरपरिषदेच्या आस्थापना विभाग वावरताना नेहमी आढळून येतात.

शहराच्या विकासाला आणि घणकचरा व्यवस्थापन करण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी येत असतो. परंतु येथे मात्र " शासनाकडून येणार्या निधीची व्यवस्था अतिशय चोखपणे होत असल्याचे दिसून येत असल्याची चर्चा होत आहे". मे जिल्हा अधिकारी यांनी शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी नगर परिषदेकडून सुरू असलेला खेळ थांबविण्यासाठी सक्षम कार्यकारी अधिकार्यांची तातडीने नियुक्ती करुन नगरपरिषदेच्या आस्थापना आणि आरोग्य विभागाला लागलेली घरघर थांबवावी अशी मागणी होत आहे.


 

Post a Comment

0 Comments