मृत्युपत्रात फेरफार करून सख्या भावाची बहिणीकडून दोन कोटींची फसवणूक गुन्हा दाखल

 Bay- team aavaj marathi 

सख्या भावाची दोन बहिणीकडून दोन कोटी रुपयांसह स्थावर मालमत्ता हाडपल्याप्रकरणी छत्रपती संभाजी महाराज नगर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघी बहिणींनी आईला विश्वासात घेऊन भावाच्या हिश्श्याचे बँक खात्यातील पैसे, प्लॉट सह शेअर्स विकून एक कोटी ९५ लाख रुपयांपेक्षा अधिकची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उद्योजक भावाच्या तक्रारीवरून पश्चिम बंगाल व राजस्थान मधील दोन बहिणी विरोधात छत्रपती संभाजी महाराज नगर येथील सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.यातील संशयित आरोपींमध्ये सुनीता दिलीप लाहोटी (रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) आणि शोभना शरद टुवानी (रा. जयपूर, राजस्थान) यांचा समावेश आहे.

यातील फसवणूक झालेले शहरातील उद्योजक सुनीलकुमार हरिकिशन कलाणी (६४, रा. बीड बायपास) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा लिंबे जळगाव येथे कारखाना आहे. त्यांचे वडील हरिकिशन कलाणी हे मूळचे पश्चिम बंगालमधील सिली गुडी येथील व्यापारी होते. फिर्यादीच्या वडिलांचे २०२० साली कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर २० मार्च २०२४ रोजी आईच्या मृत्यूनंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. आईच्या एचडीएफसी डी-मॅट खात्यावरील ८० लाख रुपयांचे शेअर्स बहिणींनी परस्पर स्वतःच्या खात्यावर वर्ग केले असल्याचे उघडकीस आले. 

त्यांनी तयार केलेल्या मृत्युपत्रानुसार सिली गुडी येथील मालमत्ता आणि बँक ठेवींचे त्यांच्या पश्चात उत्तराधिकारी म्हणून सुनील कुमार यांचे नाव होते. याचा राग मनात धरून त्यांच्या दोन बहिणी सुनीता लाहोटी (कोलकाता) आणि शोभना ढुवानी (जयपूर) यांनी कट रचून आजारी आईला विश्वासात घेऊन जयपूरला नेले. त्या ठिकाणी बँक खात्यावरील आणि डी-मॅट खात्यावरील वारसदार म्हणून असलेले सुनील कुमार यांचे नाव बदलून स्वतःचे नाव लावून घेतले.

तसेच ॲक्सिस बँक आणि पंजाब नॅशनल बँकेतील प्रत्येकी १५ लाख आणि कोटक महिंद्रा बँकेतील ५० लाख रुपये अशा मोठ्या रकमा वारसदार बदलून काढून घेतल्या. याव्यतिरिक्त जयपूर शहरातील सुशांत सिटी येथील प्लॉटवर आईच्या कोऱ्या अर्जावर सह्या घेऊन तो ३५ लाखांना विकला आणि त्याचे पैसेही दोघींनी हडपल्याचे फिर्यादी सुनीलकुमार कलानी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सातारा पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments