नांदगाव तालुक्यातील कासारी जवळील चांदेश्वरी या अवघड वळणाच्या घाटामध्ये दोन गाड्या एकमेकांना धडकल्याने झालेल्या अपघातात कापसाने भरलेला आयशर ट्रक रस्त्यावर आडवा पडल्याने रहदारी ठप्प झाली. तर दुसरा मक्याने भरलेला बारा टायर असलेला मोठा ट्रक घाटातील संरक्षण भिंत तोडून दिडशे फुट खाली उतरला.
सविस्तर वृत्त असे की, चांदेश्वरी या अवघड वाहनाच्या घाटात कन्नड तालुक्यातील चापानेर येथील कापूस व्यापाऱ्याचा कापूस घेऊन गुजरातला जाणाऱ्या आरशर ट्रक एम एच.20- जी.सी. 7329 ला रविवारी रात्री 2 वाजेच्या दरम्यान घाट उतरताना बोलठाण कडुन मकाचे पोते घेऊन जाणार्या 12 टायर असलेल्या अवजड ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने पाठी मागुन जोरदार धडक दिल्याने आयशर ट्रक घाटातील रस्त्यावर आडवा पडल्याने दोन्ही बाजूची रहदारी रात्री एक वाजेपासून ठप्प झाल्याने. दुसऱ्या दिवशी सायंकाळी आठ वाजेपर्यंत सुमारे विस तास परधाडी मार्गे दुसऱ्या घाटातून वळविण्यात आली होती.
तर मक्याने भरलेल्या अवजड ट्रकने घाटातील बांधकाम केलेली संरक्षण भिंत सोडून सुमारे दीडशे फूट खाली सरळ उतरली सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही परंतु या ट्रकचे पाठीमागील आठही चाकं आणि ब्रेक लाइनर निखळून पडले असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
कन्नड तालुक्यातील औट्राम घाट कोर्टाच्या आदेशानुसार अवजड वाहतूकीसाठी बंद केल्याने दररोज मोठ्या प्रमाणात खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस, तापी ची वाळू वाहतूक करणारे हायवा ट्रक, तसेच दक्षिण उत्तर भारतातील माल वाहतुक करणारे वाहने ट्रक, व बोलठाण येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप आवार असल्याने तेथे शेत पिकाचे वाहतूक करणारे अनेक ट्रॅक्टर छोटा हत्ती गाड्या, परिवहन मंडळाच्या बसेस असे आठशे ते हजार वाहने ये जा करत असल्याने चाळीसगाव फाटा ते मन्यड फाटा या दरम्यान असलेल्या सुमारे 50 किलोमीटर रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे. त्यातच चांदेश्वरी या उघड वर्गाच्या घाटात पूर्ण रस्ता हा अत्यंत खराब झालेला आहे त्यामुळे या घाटात वारंवार अपघातांची मालिका सुरू आहे. याबाबत अनेक वेळा शासनाचे डोळे उघडण्यासाठी व व खराब झालेल्या रस्त्याचे काम दर्जेदार होणे यासाठी गाठ माथ्यावरील सर्व ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित विभागांना वारंवार निवेदन पाठवून सुद्धा या रस्त्याचे काम करण्यात आले नाही तर दोन महिन्यापूर्वी रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती.परंतु चार ते पाच दिवसाच्या आतच डागडुजी केलेल्या खड्ड्या पेक्षा मोठे खड्डे रस्त्यावर पडल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने या रस्त्यावर पायी चालणे देखील अवघड झाले आहे.
0 Comments