Bay- team aavaj marathi
Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड यवतमाळ
उमरखेड शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात गांजा आणि तस्तम इतर अमली पदार्थांची खुलेआम विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा गंभीर आरोप करत दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघ, उमरखेड तालुका यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना निवेदन देऊन त्यावर तात्काळ कठोर कारवाईची करण्याची मागणी केली आहे.
पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, उमरखेड शहराची पूर्वीपासूनच संवेदनशील शहर म्हणून शासन दरबारी ओळख झाली असून,अशा परिस्थितीत शहरात वाढत असलेल्या गांजा व इतर मादक पदार्थांच्या विक्रीमुळे सामाजिक आणि शैक्षणिक वातावरण गंभीररीत्या बिघडत आहे.यामध्ये विशेषतः विद्यार्थी आणि युवक वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
याशिवाय अमली पदार्थांच्या सेवनामुळे कौटुंबिक वाद वाढत असून समाजातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने आतापर्यंत केलेली कारवाई नाममात्र असल्याची खंत पत्रकार संघाने व्यक्त केली आहे. यापुढे मात्र ठोस आणि कठोर पावले उचलून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी उमरखेड शहरातील सर्व शाळांना याबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सदर निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरखेड उपविभाग यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांना सादर करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष साहेबराव धात्रक, सचिव प्रा. लक्ष्मीकांत नंदनवार उपाध्यक्ष अरूण बेले , कार्याध्यक्ष प्रशांत भागवत ,कोषाध्यक्ष अजय कानडे प्रसिद्धी प्रमुख निळकंठ धोबे, वसंत देशमुख, अरविंद ओझलवार , अझर खान, डॉ विशाल माने, शैलेश ताजवे, व्यंकटेश पेन्शनवार, अविनाश मुन्नरवार , गजानन भारती, अंकुश पानपट्टे, सलमान खान, रवि भोयर, डॉ.शिवचरण हिंगमिरे, ताहेर मिर्झा, संजय देशमुख,संतोष कलाने, भिमराव नगारे यांच्यासह संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


0 Comments