औद्योगिक प्रशिक्षण केंद्र इमारतीचे उद्घाटन व नवीन वर्ग खोल्यांचे भूमिपूजन व सभासद सहविचार सभा संपन्न..

 Bay- team aavaj marathi 

शरद आहेर सर पत्रकार नांदगाव

 मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयाच्या प्रांगणात शैक्षणिक प्रगतीचा नवा टप्पा गाठत, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (ITI) इमारतीचे उद्घाटन आणि नवीन वर्ग खोल्यांच्या भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे होते. याप्रसंगी उपाध्यक्ष विश्वास जी मोरे, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापती देवराम जी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कर्मवीरांचे प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. संचालक अमित बोरसे यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण मिळावे आणि त्यांच्या रोजगाराच्या संधी वाढाव्यात, या उद्देशाने या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक संदीप गुळवे, रमेश अण्णा बच्छाव, शिवाजी गडाख विजू नाना पगार, रमेश पिंगळे, प्रवीण नाना जाधव, नंदकुमार बनकर , निंबाळकर सर,महिला संचालिका शालिनताई सोनवणे, शोभा बोरस्ते, जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी आमदार अनिल दादा आहेर जेष्ठ सभासद दिलीप अप्पा इनामदार, विष्णू निकम इ. मान्यवर उपस्थित होते.

 सरचिटणीस नितीन ठाकरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नूतन इमारतीचे फित कापून उद्घाटन करण्यात आले, तसेच भविष्यातील शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन नवीन वर्ग खोल्यांचे भूमिपूजन ही शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न झाले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कर्मवीरांचे प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. संचालक अमित बोरसे यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण मिळावे आणि त्यांच्या रोजगाराच्या संधी वाढाव्यात, या उद्देशाने या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

 याप्रसंगी उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.अनिल आहेर (माजी आमदार) "शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकल्पांची गरज आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले.बापूसाहेब कवडे (ज्येष्ठ नेते) संस्थेच्या शिस्तबद्ध नियोजनाचे आणि दूरदृष्टीचे त्यांनी कौतुक केले.

सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनीही नवीन उपक्रमाला शुभेच्छा देत ग्रामीण विकासात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांना केवळ पदव्या न देता त्यांना हाताला काम देणारे 'कौशल्य आधारित शिक्षण' देणे हेच संस्थेचे मुख्य ध्येय आहे.       

  मविप्र विद्यापीठ हि संकल्पना संस्थेच्या आणि समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून त्यामुळे समाजाचा आणि संस्थेचा विकास होईल. विद्यापीठामुळे निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच संस्थेच्या प्रत्येक सभासदाला विश्वासात घेऊनच मविप्र विद्यापीठाची निर्मिती केली जाईल असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले. या कार्यक्रमाला संस्थेचे अजिव सभासद परिसरातील नागरिक, शिक्षकवृंद, विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पगार तर आभार प्राचार्य हरिश्चंद्र ठाकरे यांनी केले.


*फोटो ओळ:- औद्योगिक  प्रशिक्षण केंद्र नांदगाव नूतन इमारती उद्घाटन करताना सरचिटणीस नितीन ठाकरे साहेब, उपाध्यक्ष विश्वास मोरे,सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी संचालक इंजि अमित भाऊ बोरसे व मान्यवर..*


Post a Comment

0 Comments