जातेगाव येथील मिशन पाचशे कोटी जलसाठा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान. मिशन 500 कोटी लिटर जलसाठा व पाच पाटील टीम आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव 2026 निमित्ताने शेतकरी सन्मान सोळा व रोजगार मेळावा दिनांक 15 व 16 रोजी राजपूत मंगल कार्यालय चाळीसगाव येथे उत्साहात संपन्न झाला.
मिशन 500 कोटी लिटर जलसाठा संकल्पक डॉ. ॲड.उज्वल कुमार चव्हाण सर मा. अप्पर आयुक्त विभाग मुंबई कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते .या सोहळ्यास रेमंड मॅगसेस पुरस्कार प्राप्त व गुंज स्वयंसेवी संस्था दिल्ली संस्थापक अंशू गुप्ता त्याचप्रमाणे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्रोही कवी नितीन चंदनशिवे व मान्यवर उपस्थित होते . त्यांनी शेतकऱ्यांना प्रबोधनात्मक आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले .शिवजयंती कशी साजरी करावी याचा मूर्तीमंत उदाहरण उज्वल दादांनी घालून दिले .
या शिवजन्मोत्सव सोहळ्यात जातेगाव गावाने मिशन अंतर्गत मोहाडी नदी खोलीकरण करून मोठ्या प्रमाणात जलसाठा तयार केला व जातेगाव येथील सटवाई बंधाऱ्यातील मागील तीन वर्षापासून गाळ काढून खोलीकरण करून घेतले, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे बांधबंधिस्त करणे,चर खोदणे इत्यादी कामे डिझेल टाका व जेसीबी चालवा या तत्त्वावर करून घेतले.
त्यामुळे जातेगाव येथील मिशनचे गाव प्रमुख ग्रामपालिका सदस्य श्री संदीप पवार व बाळासाहेब लाठे तसेच राजू शेख, पतींग चव्हाण, पोपट राऊत, किरण पगारे, रविंद्र आप्पा त्रिभुवन यांचा सन्मान करण्यात आला .ह्या वर्षी पण मिशन पाचशे कोटी जलसाठा अंतर्गत अशी कामे जातेगाव मध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे अशी माहिती श्री संदीप पवार यांनी दिली.
0 Comments