व्हि. एन. नाईक ज्युनिअर कॉलेज वसंत नगर च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आज दिनांक २ मे रोजी जाहीर झालेल्या इयत्ता बारावीच्या निकालात कला व विज्ञान शाखा परीक्षेत एकूण 323 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते विज्ञान शाखेचा निकाल 98% तर कला शाखेचा निकाल 90 टक्के लागला. त्यात सेजल राजपूत ८८.५०% , स्नेहा व्यवहारे ८५ %, निल कुमार अजबे ८४.८३ % गुण मिळवून प्रथम तीन क्रमांक पटकावला.
तर कला शाखेत नंदू मेंगाळ यास ७२.३३% कुमारी दीपिशा चव्हाण साईनाथ ७२%, भरत चव्हाण ७०. ८३ %, कुमारी योगिता भदाळे आणि मयुरी शिंदे ७२ % हे अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री एस. जी. राठोड, सचिव श्री सिद्धांत राठोड, मार्गदर्शक श्री जे. जी. राठोड, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री विश्वास सोनवणे, उपप्राचार्य श्री घनश्याम चव्हाण, श्री साई ज्ञान मंदिर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रवींद्र जाधव, पर्यवेक्षक श्री पी व्ही चव्हाण, तसेच माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments