बोलठाण चा वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवेदन आंदोलनाचा इशारा

 Bay- team aavaj marathi 

दि ४...

बोलठाण येथे नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उप अभियंता नंदकुमार देशमुख सार्वजनिक बांधकाम उपविभाग नांदगाव यांना येथील नागरिकांकडून निवेदन देण्यात आले. तात्काळ वाहतूक कोंडीचा प्रश्न न लावल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
उप अभियंता नंदकुमार देशमुख यांना निवेदन देताना नागरिक 

याबाबत सविस्तर वृत्त असे की,नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण येथे व्यापार पेठ असून नांदगाव बाजार समितीचे उप आवार आहे. त्यामुळे आणि कन्नड तालुक्यातील औट्राम घाटातून अवजड वाहनांची रहदारी गेल्या वर्षभरापासून बंद केल्याने मोठ्या प्रमाणात न्यायडोंगरी जातेगाव बोलठाण मार्गाने देशातील दक्षिण उत्तर राज्यात होणाऱ्या वाहनांच्या वाहतूकीची भर पडल्याने बोलठाण येथे नेहमी वाहतूक कोंडी होत असल्याने गावाजवळ जातेगाव रस्ता रोहिला रस्ता, जवळकी रस्ता आणि जेऊर रस्ता या चारही रस्त्याचे रुंदीकरण करून व रस्त्यावर दुभाजक अश्या मागणीचे निवेदन उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग नांदगाव यांना दिले. या निवेदनात ची माहितीसाठी प्रत आ. सुहास अण्णा कांदे, तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक नांदगाव यांना बाळासाहेब चव्हाण ,बबलू सय्यद, दिनेश रिंढे यांनी दिल्या.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जातेगाव रस्त्यावर उपबाजार समितीचे आवार, येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, राष्ट्रीयकृत बॅंक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पोलिस ठाणे तसेच मंगल कार्यालय इत्यादी हाकेच्या अंतरावर असल्याने परिसरातील व गावातील नागरिकांना कोणत्या ना कोणत्या कारणाने जावे लागते. परंतु बाजार समितीच्या आवारात येणारे शेतकरी वाहनांची व औट्राम घाट बंद केल्याने या रस्त्यावर वाढलेली अतिरिक्त वाहतूक त्याचप्रमाणे विविध व्यवसाय धारकांनी रस्त्याला लागून आपले दुकान थाटले असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

त्यामुळे अपघात घडल्यास सर्वस्वी जबाबदारी सार्वजनीक बांधकाम विभाग जबाबदार राहील. तरी तात्काळ उपाययोजना करुन नागरिकांना होणाऱ्या वाहतूक कोंडी पासून लवकरात लवकर दिलासा द्यावा. अन्यथा दि १८ मे पासून धरणे आंदोलन करण्यात येईल असे देण्यात आले.या निवेदनावर निवेदन करते आणि नागरिकांच्या सह्य आहेत.


 

Post a Comment

0 Comments