Bay- team aavaj marathi
Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड
वाणिज्य शाखेतून विडुळ येथील वैष्णवी दिलीप बिचेवार हिने ९१% गुण मिळवून महा विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे . उमरखेड येथील मॉडर्न पब्लिक स्कूल आणि उच्च महा विद्यालयातील विद्याथ्यांनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शाळेच्या यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. विद्यालयाचा वाणिज्य व विज्ञान विभागाचा निकाल १०० टक्के आहे.
तर तनिष्क जयस्वाल ९०.८३ % गुणांसह द्वितीय तर सायली मुन्नरवार आणि ओमकार गावंडे यांनी प्रत्येकी ८८.१७ % गुण मिळवून संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकावला. इंग्रजी माध्यमाच्या वाणिज्य विभागातील एकूण ५६ विद्याथ्यांपैकी २० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत Distinction, तर १६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतून रूपेश रामेश्वर कदम प्रथम, साक्षी विठ्ठल अनखुळे हिने द्वितीय, तर निकिता सुनीता चव्हाण व अस्मिता रामेश्वर सुरोशे यांनी तृतीय क्रमांक पटकावून यश संपादन केले.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे विडुळ येथील वाणिज्य शाखेतून वैष्णवी दिलीप बिचेवार हिने ९१% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला या यशाबद्दल तिचे विडुळ मध्ये विशेष कौतुक करण्यात येत असून तिचे आई, वडील सामान्य परिस्थितीतील असून, मोलमजुरी करून वैष्णवीच्या शिक्षणासाठी ते नेहमी धडपडत असतात तिच्या या यशाबद्दल तिने आई-वडील आणि आपली अतिशय अल्प मोबदल्यात ट्युशन घेणाऱ्या व्यास मॅडम यांना विशेष श्रेय दिले आहे. विद्याध्यर्थ्यांच्या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, प्राचार्य आणि सर्व शिक्षकवृंदांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


0 Comments