वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले नांदगाव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद मराठी शाळा येथे नाशिक पूर्व वनविभाग आणि वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मानव व बिबट सह जीवन आणि शून्य सर्पदंश जनजागृती हे अभियान दरवर्षी प्रमाणे वन्यजीव सप्ताह साजरा केला.
या निमित्ताने विविध प्रकारच्या वन्य प्राण्यांबद्दल माहितीपर प्रदर्शन बॅनर अथवा चित्रफिती द्वारे करण्यात प्रबोधन करण्यात आले अभियानात मानव व बिबट तसेच अन्य वन्य प्राणी यांचा संघर्ष टाळणे कामी उपाय योजना, तसेच बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात आपण काय काळजी घेतली पाहिजे याबाबत आणि आपल्या भागात आढळणाऱ्या इतर हिंस्र प्राण्यांबद्दल वनपरिक्षेत्र नांदगाव वन परिमंडळ अधिकारी एम. एम. राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी माहिती दिली. माहिती देतांना जंगलातून प्रवास करतांना प्लास्टिकच्या बॉटल पिशव्या किंवा प्लास्टिकचे इतरत्र वस्तू रस्त्यावर टाकू नये. आणि वन्य प्राण्यांना त्यापासून कुठल्याही प्रकारची इजा किंवा त्रास होणार नाही याबद्दलची काळजी घ्यावी, असे वनपाल दीपक वडगे यांनी सांगितले. तसेच जून ते ऑक्टोबर महिन्यात बदलत्या हवामानामुळे व काही सापांच्या मिलन कालामुळे सापांची वर्दळ वाढू लागते अशावेळी आपण काय उपाययोजना केली पाहिजे, ग्रामीण भागात शेतकरी आणि सापांचा नेहमी संघर्ष होत असतो सर्प आपल्या परिसरात येऊ नये किंवा आल्यानंतर अथवा सर्पदंश झाल्यानंतर त्यावर उपाययोजना म्हणून काय केले पाहिजे याबाबत सविस्तर माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र प्रभाकर निकुंभ यांनी दिली.
तसेच कार्यक्रमादरम्यान प्रमुख उपस्थितीमध्ये वनपाल. दीपक वडगे, नवनाथ बिन्नर, विष्णू राठोड, अमोल पाटील, सुरेंद्र शिरसाठ, रवींद्र शिंदे, अमोल पवार, रामचंद्र गंडे आणि वन्यजीव संरक्षण संस्थेचे मंगेश आहेर, पंकज शर्मा,संदीप जाधव. मनोज जाधव ,सुरज कमोदकर समाधान इपर उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाच्या शेवटी माध्यमिक विद्यालय जळगाव बुद्रुक मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव, सानप सर, कसबे सर, रोहित चांदवडे व इतर शिक्षक उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगाव बुद्रुक मुख्याध्यापिका महाले,शिक्षीका सोनवणे, बोरसे, रोकडे, शिक्षक टिळेकर सर, बच्छाव, ठाकरे यांनी वनविभागाच्या अधिकार्यांचे व सर्प मित्रांचे आभार व्यक्त केले.
0 Comments