नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील रहिवासी अशोक परसराम शिंदे वय ५७ ह.मु. नाशिक यांनी जातेगाव पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वसंत नगर दोन महसूल गावाजवळ मांगु सिताराम चव्हाण यांच्या शेतातील विहीरीत रविवार दि.६ रोजी सकाळी आत्महत्या केली.
या घटनेची माहिती येथील पोलीस पाटील नवनाथ राठोड यांनी नांदगाव पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भास्कर बस्ते आणि पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मयत अशोक शिंदे यांचे शव पंचासमक्ष विहिरी बाहेर काढून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान पाठवला आहे.शिंदे यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले याबाबत कारण गुलदस्त्यात असून दरम्यान पोलिसांनी प्रथम दर्शनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मयत अशोक शिंदे यांच्या पॅन्टच्या खिशात (suicide note) सुसाईड नोट मिळाली असुन त्या अनुषंगाने उप विभागीय पोलिस बाजिराव महाजन मनमाड व पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांचे मार्गदर्शना खाली पोलिस हवालदार भास्कर बस्ते हे पुढील तपास करीत आहेत.
0 Comments